गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून धानोरा येथील नवीन बस स्टॉप समोरील पटांगणात अवैध गांजा तस्करी करणाऱ्यांच्या गडचिरोली पोलिसांनी मुसक्या अवळल्या./जय निशीथ बाला, (२२), रा. आर. एस. नंबर-२, ता. जवलगैरा, जि. रायचुर राज्य कर्नाटक, मनिशंकर नलीतमहान सरकार (३२), रा. आर. एस. नंबर २, ता. जवलगैरा, जि. रायचुर राज्य कर्नाटक असे आरोपीचे नाव असून २ लाख १५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. सदर कारवाई गुरुवार २३ मार्च रोजी करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवार २३ मार्च २०२३ रोजी दोन संशयित इसम बॅगांमध्ये गांजा हा शासनाने प्रतिबंधित केलेला मादक पदार्थ बाळगुन नविन बसस्टॉपकडे पायी येत असल्याची गोपीनिय माहिती पोलीस स्टेशन धानोराला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सदर इसमांकडे असलेल्या तिन्ही बॅगांची पंचासमक्ष तपासणी केली असता त्या बॅगामध्ये फिकट हिरवट रंगाचा उग्र वास येणारा सुखा गांजा वस्पतीचे ‘एकुण ८ गठ्ठे वजन १९ किलो ०.१५ ग्रॅम तसेच ईतर साहित्य असा एकुण २, १४, ८५०/- (दोन लाख चौदा हजार आठशे पन्नास ) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. याप्रकरणी त्यांचे विरुध्द गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सुधाकर देडे पोलीस स्टेशन धानोरा हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप तसेच पोहवा / १७४२ पुरुषोत्तम टेंभुर्णे, पोना गितेश्वर बोरकुटे, पोना लक्ष्मीकांत काटेंगे, पोना रुपेश दरों, पोशी अमोल कोराम, पोशी कपील जिवणे, पोशी प्रविण गोडे, पोशी मारोती वाटगुरे, पोशी तुकाराम कोरे, मपोशी प्रिती गोडबोले यांनी केलेली आहे. सदर कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.