महाविकास आघाडी सरकारने, वाशिम जिल्ह्याचा विकास करण्यात, लागोपाठ अडीचवर्ष दिरंगाई करून, पार हद्द केल्याचेच त्यांच्या कारभारावरून दिसून येत आहे . तसेच जिल्ह्यात शिवसेनेच्या दिर्घानुभवी खासदार भावनाताई गवळी, राष्ट्रीय काँग्रेसचे एकनिष्ठ युवा आमदार अमित झनक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि मिनिमंत्रालयाचे प्रमुख म्हणजेच जि प . अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या सारखे दिग्गज जिल्ह्यात असतांना सुद्धा महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री, रयतेचे राजे ना. शंभूराजे देसाई यांनी, गेल्या अडीच वर्षापासून, जिल्ह्यातील शासकिय निमशासकिय गठीत केल्या नसल्यामुळे, शासनाच्या विविध कार्यालयाच्या अनेक विभागातील, वाशिम जिल्ह्यातील विकास कामे रेंगाळलेली असून,जनता जनार्दनांची सेवा करण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून जिल्ह्यातील मतदार नागरिकच नव्हे तर प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना शासकिय निमशासकिय समिती मध्ये पदाधिकारी म्हणून सन्मानाचे स्थान मिळत नसल्याने कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींवर १००% नाराज झालेले असून, प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांचा आक्रोश उफाळत आहे .
इतिहास काळापासून परंपरागत रयतेचे राजे असणारे, राज्याचे गृहमंत्री, ना शंभूराजे देसाई वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभल्यामुळे येथील जनतेच्या आशा उंचावलेल्या होत्या परंतु ना शंभूराजे देसाई यांनी जिल्ह्याकडे सपशेल दुर्लक्षच केलेले आहे ही वाशिम जिल्ह्याची शोकांतिका आहे . आता महाविकास आघाडी सरकारचे केवळ अडीच वर्ष उरले . परंतु अद्यापही शासकिय निम शासकिय समित्याच्या गठना करीता पालकमंत्री उत्सुक दिसत नसून वाशिम जिल्ह्याकरीता त्यांना वेळच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.महाविकास आघाडी सरकार बद्दल मतदार राजाच्या तक्रारी वाढल्या असून मतदाता राजामध्ये नारिजीचा सुर घुमत आहे.
मतदात्या राजा ला नाराज करू नका आणि त्वरित विकासकामाकडे लक्ष द्यावे.