पतंजली योग परिवारतर्फे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सत्यनारायणजी अनमदवार आणि डॉ. राम राऊत हजर होते
योग प्राणायाम या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच आरोग्याविषयी जनजागृती आणि विविध प्रबोधनात्मक कार्य केल्याबद्दल याप्रसंगी श्री. सत्यनारायणजी अनमदवार, नायब तहसीलदार, कुरखेडा यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी योगाचार्य श्री. सत्यनारायणजी अनमदवार यांनी दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा प्रसार अधिक व्यापकतेने करण्याचा मानस बोलून दाखविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राम राऊत यांनी केले.
याच कार्यक्रमात पतंजली योग परिवारच्या जिल्हा सोशल मीडिया प्रभारी सौ. ज्योती मुकुल खेवले यांनी चित्रफितीद्वारे पतंजली योग परिवार, आरमोरी तर्फे आजपर्यंत करण्यात आलेल्या विविध उपक्रम व सेवाकार्यांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रभाकर गडपायले, श्री. लालाजी बुराडे, सौ. सुनीता काळबांधे, सौ. सुरेखा देविकार, सौ. मनीषा दुधे, कल्याणी दहिकार हे योग शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे संचालन सौ. ज्योती खेवले यांनी केले