" सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख फार मोठा आहे.१८४८ त्यांनी भिडेवाडयात भारतातील पहिली मुलींची शाळा काढली.महात्मा जोतिराव फुलेंच्या खांद्यावर खांदा लावून स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला.त्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रस्थापित समाजकंटकांना धडा शिकवून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत पेटविली " असे बहूमोल विचार उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी व्यक्त केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बोलत होते.कार्यक्रम प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.