अकोला :--विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबतच वारकरी संप्रदायाचे संस्कार दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. शांताराम बुटे यांनी केले.
संत गजानन महाराज मंदिर संस्थान देशमुख पेठ अकोला येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापना प्रसंगी बोलत होते.माजी महापौर सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बबनराव कानकिरड ,प्रशांत पिसे पाटील, संजय फुलेलू , शंकरलाल शर्मा, गोपाळ राजवेद्य, गोकुळ माऊली, गजानन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
वारकरी संप्रदाय ही जीवन शिक्षणाची पाठशाळा आहे.आपली संस्कृती संवर्धनासाठी संतांनी सुपीक विचाराची पेरणी केली असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शांताराम बुटे यांनी या प्रसंगी केले.
15 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी संत श्री गजानन महाराज मंदिर संस्थान देशमुख पेठ अकोला येथे वारकरी शिक्षण संस्था गुरुकुलची स्थापना करण्यात आली.
वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतचे मुलं आणि मुली यांना वारकरी शिक्षण, धार्मिक संस्कार,संस्कृती त्याचप्रमाणे गीतेचे अध्याय, हरिपाठ, पावल्या, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत , कीर्तन प्रवचन, वादन ,मृदंग ,गायन शिकवल्या जाणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक ह. भ. प. श्री गोपाल महाराज जोगदंड यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार दर्शन अमोल सातपुते यांनी केले.
याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब माहुलकर,संतोष भाऊ मोटे, डॉ श्रीकांत जयस्वाल, चेतन पाटील, प्रज्वल इसाळ, प्रदीप लुगडे,आकाश इंगळे, दामोदर पाटील, चंद्रकांत गयले,किसन लहुकार, सुभाष करुले , सौ करुणा बुठे,श्रीमती सिंधुबाई सातपुते,सौं निंबाळकर ताई, सौ शोभाताई वाकोडे, सौ रत्नमाला थोरात, सोजर बाई मिस्के, सौ लिफ्टे, सौ भंगाळे, कुलदीप लुटे, कृष्णा ठाकरे,रवींद्र भंगाळे, सुभाष भवाने, सौ स्वाती मांडेकर यांचेसह परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते .या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील 35 विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण व वारकरी शिक्षणासाठी नोंदणी केली असून त्यांची निवासाची व्यवस्था श्री गजानन महाराज मंदिर समितीतर्फे करण्यात आली आहे. ह.भ.प. गोपाल महाराज जोगदंड, प्राचार्य डॉ. शांताराम बुटे,प्रशांत पाटील, अमोल सातपुते आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....