दिनांक ०६/०४/२०२२२ रोजी रात्री ब्रम्हपुरी पोलिसांच्या विशेष पथकास गोपनीय माहिती नुसार ब्रम्हपुरी आरमोरी मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या चाराचाकी वाहनातून अवुध रित्या दारू वाहतूक होत आहे. त्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून एका पांढऱ्या रंगाच्या फोर्ड कंपनीची फिगो कार क्र.MH 02 DG 2374 ताब्यात घेवून सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण १,६४,४०० रुपये देशी दारू चा मुद्देमाल मिळून आला. अवैधरित्या दारू वाहतुकी करिता वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगांची फोर्ड कंपनी ची फिगो कार किमंत:-२,००,०००/- व मुद्देमाल किंमत १,६४,४००/- रूपये असा एकूण ३,६४,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहनाचा चालक मोरेश्वर पंढरी मिसार रा. बेटाळा ता. ब्रम्हपुरी जी.चंद्रपूर यास ताब्यात घेवून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई मा .उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मिलींद शिंदे साहेब, पोलिस निरीक्षक श्री.रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.प.नि. श्री मोरेश्वर लाकडे, सा.पो. हवा/ २०२० नरेश रामटेके, नापोअंम/ २५५२ मुकेश गजबे, नापोअंम/१७३४ शिवणकर, नापोअंम/५०४ सचिन बारसागडे, नापो अंम/२३९४ प्रकाश चिकराम यांनी केली आहे.