वाशिम : एखाद्या देवदूताप्रमाणे पावसाच्या पुढील अंदाजाची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील ग्राम रुई (गोस्ता) येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे अंदाज अचूक ठरत असल्याने संपूर्ण विदर्भ, मराठवाडा,खान्देश,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील शेतकरी राजांची गोपाल गावंडे यांचेवर हळूहळू प्रचंड विश्वास व श्रद्धा बसत आहे.कित्येक शेतकरी तर त्यांच्या अंदाजाप्रमाणे शेतातील कामे व आपल्या पेरण्या उरकून घेत असतात.अनेक शेतकरी रात्रंदिवस त्यांचेशी फोनवरून संवाद साधत असतात.दि 01 एप्रिल रोजी महाराष्ट्र हरित सेनेचे आजिवन सदस्य तथा आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळी यांचेशी संवाद साधताना दि 05 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत गारपिट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज दिलेला होता व बऱ्याच वृत्तपत्रांनी ह्या अंदाजाला प्रसिद्धी सुद्धा दिली होती. त्यांच्या ह्या अंदाजाप्रमाणे गुढीपाडव्याचे दिवशी दि 09 एप्रिल 2024 रोजी तर भर दुपारी अचानक निरभ्र आकाशात अवकाळी ढग दाटून आले. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिर,रिसोड,कारंजा येथील तालुक्यात तर बुलडाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी खामगाव तालुक्यात गारपिट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून शेतात गारांचे ढिग असल्याचे वृत्त हाती येत आहे.तसेच परत मध्यरात्री पाऊसाचा अंदाज आहे.भर उन्हाळ्यात पावसाळ्या सदृश्य वातावरण तयार झाले असून त्यामुळे आणखी पुढील पाच दिवसात संपूर्ण महाराष्ष्ट्रात भाग बदलवून अनेक ठिकाणी अवकाळी होण्याचा अंदाज गोपाल गावंडे यांनी दिला आहे. ह्या पावसाने उन्हाळी पिके, पालेभाज्या आणि संत्रा,आंबा आदी फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.तरी सुद्धा शेतकऱ्यानी आपल्या शेतमालाचे व घरादाराचे रक्षण केले पाहिजे. या दिवसात प्रचंड वादळी वारे, ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात गारपिट, पाऊस होण्याची अवकाळी मध्ये शक्यता असल्याने ग्रामस्थानी शेतात व हिरव्या झाडाखाली थांबू नये.आपल्या शेळ्यामेंढ्या, गुराढोराची व शेतमालाची विशेष काळजी घ्यावी असे गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी कळवीले आहे.