कारंजा (लाड) : ऐन कोव्हिड 19 कोरोना महामारी काळात मालेगाव पो.स्टे. मधून कारंजा शहर पोलिस स्टेशनला बदलून आल्या नंतर,आपल्या हजरजवाबी,समयसूचकता आणि कार्यदक्ष कामगीरीने आणि प्रामाणीक,विश्वासू व मनमिळाऊ स्वभावाने,कारंजेकर नागरिकांशी सामंजस्याने संवाद साधीत,कोव्हिड 19 कोरोना महामारीवर नियंत्रण राखण्यात कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार असलेले पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने १००% यशस्वी झाले होते.आज त्यांचे यवतमाळ येथे प्रशासकिय स्थानांतर झालेले असल्यामुळे, रविवार दि 25 जून रोजी, सकाळी 10:00 वाजता,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी,त्यांची सदिच्छा भेट घेऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी अध्यक्ष संजय कडोळे,खेर्डा काळी ग्रामपंचायतचे मा.सरपंच प्रदिप वानखडे,साप्ताहिक करंजमहात्म्यचे सहसंपादक उमेश अनासाने,तेजस बारबोले यांनी त्यांचा सत्कार करून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात, कारंजा शहरातील शांतता, सदभावना व सामंजस्याकरीता केलेल्या अविस्मरणिय अशा कार्याचे कौतुक केले. यावेळी बोलतांना संजय कडोळे म्हणाले, "साहेब संवेदनशिल असणाऱ्या कारंजा शहरात आपण पदभार घेतल्यानंतर,आपल्या कार्यकाळात आपणावर अनेक जबाबदाऱ्या होत्या.परंतु आपण त्या यशस्वीपणे पेलल्यात.यशस्वी शोध मोहिम राबवीत अनेक गुन्हे आपण उघडकीस आणले.आपल्या सायबर सेलमुळे अनेक सायबर गुन्हे उघडकीस येवून सायबर गुन्ह्यावर वचक बसला.मोबाईल धारकांचे मोबाईल परत मिळविले.बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारीवर वचक बसवीला.त्याचप्रमाणे शांतता समिती व आम्हा पत्रकारांच्या माध्यमातून सामान्य माणसांमध्ये मिसळून कारंजा शहरात "न भुतो न भविष्यती"अशी शांतता,संयम ,सदभावना व परस्पराविषयी सहकार्याची भावना प्रस्थापित केली.आपले हे ऋण कारंजेकर विसरू शकणार नाहीत.आपण आज आम्हाला सोडून स्थानांवरावर जात आहात.याचे आम्हाला नक्कीच दुःख आहे. मात्र आपली पदोन्नती होऊन,भविष्यात केव्हातरी उपविभागीय अधिकारी पदावर पदोन्नती होऊन आपण परत एकदा कारंजाला याल अशी आमची रास्त अपेक्षा आहे. आम्ही आपली प्रतिक्षा करू . असो भविष्यातील वाटचाली करीता आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. " यावेळी पोलिस निरिक्षक सोनोने साहेबांनी सुद्धा, खरोखरीच कारंजा नगरीतील सर्वच धर्मीय नागरिक खूपच चांगले असून, तिर्थक्षेत्राच्या कारंजा नगरीतील नागरिकांनी दिलेले सहकार्य माझ्या कायम लक्षात राहील" असे उद्गार काढले.