कारंजा (लाड) : महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम द्वारा संचालित अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केन्द्राच्या सहकार्याने, कारंजा येथील समिक्षा महिला बचत गटाच्या माध्यमातून "तेजस्विनी आटा निर्मिती व प्रक्रिया उद्योग केन्द्राचे" उद्घाटन शुक्रवार दि.19 जुलै 2024 रोजी तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्र, (संपर्क भ्रमणध्वनी : 8308160986) माणकनगर,बालाजी मंगलमजवळ शोभनाताई चवरे शाळेजवळ,मंगरुळपिर रोड, नविन बायपास कारंजा (लाड) येथे करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून, माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे,बँक ऑफ महाराष्ट्र कारंजाचे शाखा व्यवस्थापक राहुल मुठाळ,बँक ऑफ इंडिया कारंजाचे शाखा व्यवस्थापक गणेश धांडे,माविमच्या कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, गुरुदेव सेवाश्रमाचे संचालक सुनिल दशमुखे,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे उपस्थित होते.सर्वप्रथम या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण व प्रदूषणाचा समतोल राखण्या करीता परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात येऊन विद्युत स्विच दाबून,तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्राचे उद्घाटन करण्यात येऊन मान्यवरांना प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
त्यानंतर महिला बचत गटाच्या भगीनींनी सर्व मान्यवरांचे आणि शेतकरी व वितरकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सहर्ष स्वागत केले.समिक्षा महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा तेजस्विनी उद्योगाच्या प्रमुख उद्योजिका सौ छायाताई गावंडे यांनी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त केले.यावेळी आपल्या उद्घाटनपर संभाषणातून बोलतांना केशव पवार यांनी सांगीतले की, " कारंजा येथील बचत गटाच्या माध्यमातून समिक्षा बचत गटाची प्रगती तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्राच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून निश्चितच प्रशंसनीय असी आहे. माविमने बघितलेले महिला उद्योजक बनविण्याचे स्वप्न आज या समिक्षा बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होतांना दिसत आहे." तर राजेश नागपूरे म्हणाले की, बचत गटाद्वारे तेजस्विनी आटा निर्मिती केन्द्र उभारणे म्हणजे महिलांची प्रगतीकडे चांगली वाटचाल होत आहे. त्यामुळे भविष्यात वेळोवेळी लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीकरीता सौ छायाताई गावंडे व त्यांच्या महिला सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला व्यवस्थापक शेखर खोडवे,सचिव सौ अंजली फुरसुले,कोषाध्यक्ष प्रज्ञा मेश्राम व बहुसंख्य महिला मंडळीची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थापक विजय वाहने यांनी तर समारोपीय आभार सौ.छायाताई गावंडे यांनी मानले.