कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : राज्यातील वातावरण आणि त्याचे परिणाम, याचे पडसाद आपल्या शहरावर पडता कामा नये.आणि आपल्या शहरातील शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये.यासाठी दक्षता म्हणून शहर पोलीस स्टेशन कारंजाच्या वतीने,सोमवार दि १२ जून रोजी,पोलीस स्टेशन कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनीने होते.सदर बैठक ही राज्यामधील परिस्थितीचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता घेण्यात आली.याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शांतता समिती सदस्य,मौलाना मंडळी आणि पत्रकार मंडळीची विशेष उपस्थिती होती.सर्वप्रथम पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी आपल्या प्रास्ताविकातून संवाद साधत बैठकीचा उद्देश समजावून सांगीतला व शातंता समिती सदस्यांकडून मार्गदर्शनपर सूचना मागीतल्या. त्यावर कपिल महाजन,श्याम सवाई,विजय भड,एकनाथ पवार,सुनिल फुलारी,डॉ अजय कांत आदींनी आपले विचार मांडून,कारंजा शहरातील शांतता अबाधीत ठेवणार असल्याचे सांगीतले तसेच शाळा व महाविद्यालयात, विद्यार्थ्याच्या मोबाईलच्या अतिवापरावर अंकुश ठेवण्याकरीता त्यांच्या पालकांचे, आपल्या सहकार्यातून प्रबोधन करणार असल्याचे सुचवीले. पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने म्हणाले, "मोबाईलच्या सेटिंग मध्ये जर आपण गेलात तर आपल्या मुलाने किंवा मुलीने मोबाईलचा वापर किती वेळ पर्यंत आणि कशाप्रकारे केला ? त्याने कोणाकोणाला फोन केले ? कितीवेळ बोलला ? व्हॉटस् एप कितीवेळ वापरला ? कोणत्या वेबसाईटवर काय पाहीले ? हे प्रत्येक आईवडिलांना,पालकांना शोधता येते.त्यामुळे त्यांना आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवता येते.व असे नियंत्रण पालकांनी ठेवले पाहीजे." असे स्पष्ट केले. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी जगादिश पांडे यांनी, "आपले कारंजा शहर शांती,सामंजस्य व सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून,राज्यात इतरत्र होणाऱ्या घटनांशी आपल्या शहराला काहीही घेणे नाही.त्यामुळे परगावात होणाऱ्या घटनांचे पडसाद उमटवू देऊ नये.आपण रस्त्यावर येऊ नये.आणि महत्वाचे म्हणजे समाजमाध्यमावर ( मोबाईल व्हॉट्सप ग्रुपवर ) येणारे चुकीचे संदेश,व्हिडीओ फॉरवर्ड करूच नये.व कदाचित चुकीने जरी एखाद्याने काही संदेश टाकला तर आम्ही तो कोण ? कोठला ? कोणत्या पक्षाचा ? याकडे लक्ष्य देणार नाही व त्याची अजिबात गय करणार नाही.व याबाबत व्हॉटस् एपच्या सर्वच ग्रुप अँडमिन यांना सतर्क करीत आहोत त्यामुळे एखाद्याने जर समाज माध्यमा वरील ग्रुपवर एखादा चुकीचा संदेश टाकला तर ग्रुप अँडमिनने ताबडतोब,संदेश टाकणार्याला समज द्यावी. आणि चुकीचा संदेश काढून टाकावा. डिलेट करावा.अन्यथा अशा ग्रुपवर पोलिस विभागाच्या सायबर सेल द्वारे गुन्हा दाखल केला जाईल व या गुन्ह्यामध्ये कुणाचीही गय केली जाणारच नाही.तसेच या संदर्भात हायस्कूल,महाविद्यालय, जीम,व्यायामशाळा,कोचिंग क्लासेस येथे आणि कॉर्नर सभा घेऊन,मोबाईल वापराविषयी प्रबोधन सुद्धा करणार असल्याचे सुतोवाच केले. तसेच कारंजा शहरातील शांतता अबाधीत राहण्याचे आवाहन केले.बैठकीचे सुत्रसंचालन पोलीस नीरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक वाघमोळे यांनी मानले असे वृत्त बैठकीला उपस्थित आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.