अकोला-- पारदर्शक व्यवहार आणि शिस्तबध्द वाटचालीने सहकार क्षेत्रातील शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार प्राप्त उल्लेखनीय संस्था मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.अध्यक्ष जे.टी. वाकडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव डॉ.रणजित देशमुख यांनी विषय वाचन केले.तर पदाधिकाऱ्यांनी आर्थिक वाटचालीतील विविध विषयांवरील झालेल्या कामकाजाचे व हिशोब पत्रांची माहिती सभासदांना दिली. सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून समाजोध्दारक संत गाडगे बाबा व माता सरस्वती वंदन आणि संस्थेचे शिल्पकार संस्थापक- अध्यक्ष स्व.स्वामी शांतानंद सरस्वती यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी काकासाहेब दिक्षित सहकार प्रशिक्षण केन्द्राचे प्राचार्य....साळूंके यांनी सभासदांना विविध विषयांवरील माहिती देऊन सहकार प्रशिक्षण पार पाडले.
याप्रसंगी अध्यक्ष जे.टी.वाकोडे यांनी संस्थेच्या विकासात्मक वाटचालीवर प्रकाश टाकला.स्व. स्वामी शांतानंद सरस्वती यांनी लावलेल्या सहकारातील या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी ठेवी,आवर्ती ठेवी आणि योग्य कर्जवाटप साठी योग्य सभासदांना संस्थेसोबत जोडण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून सभासदांना केले.याप्रसंगी सभासदांच्या दहावी,बारावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून अध्यक्षांसह सर्व संचालकांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
खजिनदार भास्कर काळे यांच्या बहारदार संचलनाखाली हॉटेल सेन्टर प्लाझा येथे झालेल्या या सभेला उपाध्यक्ष दिनकर घोरड,सचिव डॉ.रणजित देशमुख,माजी अध्यक्ष व संचालक संजय एम.देशमुख,संचालक देवीदास घोरळ,माणिकराव सरदार,विजयराव बाहकर,सौ.शोभाताई तेलगोटे,सौ.जयश्री बोचरे,प्रा.विजय काटे,सुरेश तिडके,अधिकारी मंडळी,व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे,रोखपाल श्रीमती कुंदा पवार,लेखापाल विकी क्षिरसागर व बहूसंख्य सभासद उपस्थित होते.