कारंजा:- दिनांक १३ नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यातील (जि.अहिल्यानगर) गुहा गावातील नाथपंथीयांचे आराध्य दैवत श्री कानिफनाथ देवस्थानात ऐन दिवाळीत एका विशिष्ट समाजाच्या दंगेखोरांनी धुमाकुळ घालून नाथभक्तांना मारहाण केली याचा निषेध म्हणून संबंधित गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी याकरिता वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने दि. २३ नोहेंबर २०२३ रोजी कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांचे कार्यालयामार्फत मा.गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,दिपावलीच्या निमित्ताने मंदीर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालु असतांना अचानकपणे एका विशिष्ट समाजाच्या जमावाने हे मंदीर नसुन आमचे प्रार्थना स्थळ आहे असे म्हणत मंदीरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली व तेथे चालु असलेली पुजा तथा भजन बंद पाडले. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पुजा भजने बंद पाडून हिंदुंना मारहाण केली जात आहे. येथे नेहमी दर गुरुवारी तसेच दर अमावस्येला कानिफनाथांची नित्य पुजा अर्चना केली जाते. असे असतांना नाथ भक्तांवर थेट आक्रमण करण्यात आले. ही घटना मोगलाईची आठवण करुन देणारी आहे. या घटनेचा वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहोत असे वृत्त संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी कळविल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगीतले.
सदर मंदीराचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असतांना कायदा हातात घेऊन ऐन दिवाळीत नाथ भक्तांवर आक्रमण करणे अतिशय निंदणीय आहे. आणि हे काय कमी होते म्हणून आपल्या विभागाने 58 हिंदू नाथ भक्तांवर गुन्हे दाखल केले आहेत, सदर नाथभक्तांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे काही शडयंत्र आहे का? या घटनेमागे कोण मास्टरमाईंड आहे ? याची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर मोका अंतर्गत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने करण्यात आली.