बसची संख्या कमी आणि प्रवाशांची तोब्बा गर्दी !विभागातील प्रत्येक आगाराला नविन बसेसची प्रतिक्षा ! बस फेऱ्या वाढावीण्याची गरज . बस मार्गात पंचक्रोशीतील ग्रामिण परिसर वस्त्या वाड्या गाव खेडे जोडण्याची गरज.
कारंजा (लाड) : ( जिल्हा प्रातिनिधी संजय कडोळे )* सध्या महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून संपूर्ण महाराष्ट्रात लालपरी, शिवशाही, एशियाड इत्यादी बसेस चालवील्या जात असून महामंडळाकडून माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, अधिस्विकृती धारक पत्रकार , शासनाचे पुरस्कारार्थी आणि विद्यार्थी यांना सुट दिली जाते. सध्या खाजगी वाहनाचा चोहीकडे सुळसुळाट झालेला असल्याने महामंडळाच्या प्रवाशाचे प्रमाणही कमीच झाले होते. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे प्रमाण पहाता खाजगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर धावणे गरजेचे सुद्धा आहे. मात्र महामंडळाच्या सुरक्षित प्रवासासाररखा दुसरा कोणताही सुखकर प्रवास उपलब्ध नसल्याने ७५ % गोरगरिब प्रवाशाचा ओढा आजही महामंडळाकडे आहे . मात्र दुदैवाने हव्या त्या सुविधा महामंडळाला देवून जनतेच्या सुरक्षित प्रवासाची हमी देण्यास शासन कमीच पडत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. यामध्ये सर्वात गंभीर प्रश्न आहे, महामंडळाची सेवा चोवीस तास उपलब्ध करून देणाऱ्या एसटी कामगारांचा. जोखीमीची डयुटी असतांनाही शासनाने महामंडळाच्या कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून समाविष्ट केलेले नाही.शिवाय जोखमीची ड्युटी करीत कर्तव्य पार पाडणाऱ्या चालक वाहक यांत्रीक कामगारांना पुरेसे वेतन तर मिळतच नाही व जे तुटपूंजे वेतन मिळते ते सुद्धा दरमहा वेळेवर मिळ्त नाही. परंतु तरीही महामंडळाचे कामगार आपले कर्तव्य पार पाडत आहेत.मात्र विद्यमान महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांकरीता आणखी दोन सवलती जाहीर केल्यात .त्या म्हणजे १) ७५ वर्षा वरील वयोवृद्ध प्रवाशांकरीता मोफत प्रवास आणि २) महाराष्ट्रातील सर्वच महिलांना प्रवासात ५०% सवलत. या सवलतीचा महामंडळाला निश्चितच प्रवाशाची गर्दी आपणाकडे खेचण्याचा लाभ मिळाला असून त्यामुळे एसटी प्रवासात केवळ सवलत धारक प्रवाशाचीच गर्दी वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानाने प्रत्येक आगारातील बसेसची संख्या कमी असल्याने फेऱ्या करीता बसेस कमी पडत आहेत. शिवाय सवलत धारकाचे आधारकार्ड तपासून वाहकांना सवलत द्यावी लागते . व अनेक प्रवासी त्यांचे प्रवासाची सवलत मिळविण्याचे वय नसतांना वाहक चालका सोबत भानगडी करीत आहेत . तर महिला मंडळी जागेसाठी, इतर सामान्य प्रवासी आणि चालक वाहकांशी भानगड आणि अरेरावी व शिवीगाळ सुद्धा करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी प्रवाशां करीता जशा सवलती जाहिर केल्यात. तशाच सवलती मुळे होत असलेल्या परिणामाचा, गर्दीचा व प्रवाशांकरीता लागणाऱ्या बसेसच्या विचार करून त्यांचेकरीता प्रत्येक आगाराला नविन बसेस पुरवाव्यात . आणि प्रत्येक मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्या प्रत्येक आगारामधून वाढवाव्यात आणि विशेषतः ग्रामिण भागाशी नव्याने बसेसच्या फेऱ्या सुरु कराव्यात.अशी मागणी कारंजा येथील प्रवाशांच्या वतीने पत्रकार संजय कडोळे यांनी केली आहे.