यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे माजी खासदार तथा भटक्या विमुक्त ओबीसी समाजाचे संघर्षशिल नेते हरिभाऊ राठोड यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षावर विश्वास ठेवून आम आदमी पक्षामध्ये जाहिर प्रवेश घेतल्यामुळे त्यांच्या रुपाने, यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये आम आदमी पक्षाचा दमदार प्रवेश होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणूकीच्या पाश्वभूमिवर आम आदमी पक्षाने विदर्भात रणनिती आखण्याची खेळी खेळल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला प्राप्त झाले आहे. एकेकाळी हरिभाऊ राठोड हे भाजपा खासदार असतांना भाजपाचे दिवंगत नेते स्व गोपिनाथजी मुंढे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. केन्द्र शासनाने भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्याकरीता रेणके आयोगाची शिफारस लागू करून ह्या समाजाला न्याय मिळवून द्यावा हयाकरीता केन्द्र शासना सोबत त्यांचा लढा सुद्धा सुरु आहे त्यामुळे या दमदार नेत्याची आम आदमी पक्षात झालेली एन्ट्री ह्या लोकसभा मतदार संघातील राजकीय चित्र बदलवू शकेल का ? इकडे जाणकारांचे लक्ष्य लागले आहे .