कारंजा (लाड): बंगालच्या उपसागरापासून तर मुंबईच्या अरबी समुद्रापर्यंतच्या वातावरणात,प्रचंड असा कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे,सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राच्या,कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर व मध्यमहाराष्ट्र,खान्देश,पूर्व मराठवाडा,पूर्व व पश्चिम विदर्भात कुठे ढगफुटीसदृश्य
अतिमुसळधार तर कुठे मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत असून अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले आहे,जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वहात असून, जवळपास सर्वच धरणं,पाझर तलाव,जलाशय तुडूंब भरल्यामुळे,सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी धरणाचे पाणी सोडल्या गेल्यामुळे नदी नाल्याचे पाणी शेतकऱ्याच्या शेतजमिनीत जात असल्याने आणि महत्वाचे म्हणजे ढगफुटीगत अति मुसळधार पावसाने शेतपिकांसह जमिनी खरडून गेल्याचेही वृत्त आहे.तर डाबरीच्या सर्वच भागातील पिके अतीपावसाने पिवळे पडत असून सडले आहेत,पालेभाज्या व वेलवर्गीय फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे अशा नुकसानीचे शेताच्या बांधावर तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई म्हणून,शासनाने हाथोहाथ सरसकट आर्थिक मदत देणे गरजेचे झाले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, मागील आठवडयात दि.१२ ते १४ ऑगस्ट व दि. १५ च्या दिवसभराचे उघाडीनंतर रात्रभर तसेच दि. १६ ते दि. १९ ऑगष्ट चे सकाळ पर्यंत सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्या रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आलेले असून, गोरगरीब नागरीकांच्या झोपडी पट्टी आणि घरा घरात पाणी शिरले आहे. टिनपत्रे आणि स्लॅपला झरे लागल्या गत गळत आहे. शिकस्त इमारतीच्या भिंती पडत आहेत. शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्याची पिके धोक्यात आलेली आहेत. नदी नाले परिसरातील अडाण धरण तुडूंब भरलेले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून अडाण नदी तिरावरील खेडेपाडे, घरेदारे, शेत जमीनीमध्ये पाणीच पाणी होत आहे.राज्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार,येत्या आजपासून दि.२२ ऑगष्टपर्यंत वाशिम, अमरावती,अकोला,यवतमाळ, चंद्रपूर,वर्धा,भंडारा,गडचिरोली, नागपूर,नांदेड,हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.१९,२०,२१,२२ रोजी रात्रंदिवस मुसळ्धार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी घेतलेल्या हवामानाच्या आढाव्याच्या अभ्यासानुसार दि.१७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत राज्यात व पूर्व पाश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी भाग बदलवून बदलवून पाऊस होऊ शकतो.त्यानंतर ऑगस्टच्या शेवटल्या आठवड्यात काही भागात श्रावणसरी किंवा बारिक सारिक पाऊस होईल.नंतर हळूहळू पावसाचे प्रमाण कमी होत जाईल.तर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात राज्याच्या कोकण किनारपट्टी,उत्तर महाराष्ट्र,पूर्व विदर्भ,झाडीपट्टी,देशपट्टी भागात श्रावणसरींच्या आनंदासोबतच काही ठिकाणी जोरदार पाऊसही होईल.असा प्राथमिक अंदाज असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....