कारंजा (लाड): विदर्भातील अकोला येथे दिनांक २३आणि २४ एप्रिल २०२३ रोजी मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर यांच्यावतीने "विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रत्यक्ष माहिती देऊन,अँड मंगलाताई नागरे यांनी सविस्तर वृत्त देतांना सांगीतले की,
देविकामाई देशमुख प्राथमिक शाळा, मलकापूर ,अकोला येथे संपन्न होत असलेल्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या परिसराचे"कविता डवरे लाहुडकर साहित्य नगरी" परिसर असे नामांकन करण्यात आलेले आहे. विदर्भातील प्रख्यात लेखिका डॉ. शोभाताई रोकडे या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत तर उदघाटक म्हणून नागपूरच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. मनीषा यमसनवार लाभलेल्या आहेत.
प्रमुख अतिथी नागपूरच्या मा.विजयाताई ब्राह्मणकर, अकोला येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. सुचिता पाटेकर आणि कस्तुरी सामाजिक संस्थेचे संचालक अध्यक्ष
प्रा. किशोर बुटोले उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदेश संघर्ष संघटनेचे अध्यक्ष असलेले अकोला येथील डॉ. विजय दुतोंडे स्वागताध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळणार आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये विदर्भातील विविध क्षेत्रात आपले नाममुद्रा प्रखरपणे उमटविणाऱ्या साहित्यिक भगिनींना मान्यवरांच्या शुभहस्ते विदर्भ स्त्री रत्न पुरस्कारा ने सन्मानित करण्यात येणार आहे.. नवनिर्मितीचा कायम ध्यास असलेल्या नऊ स्त्री लेखिकांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या शुभहस्ते उदघाटन सत्रात प्रकाशन होणार आहे .
ग्रंथदिंडीने सुरुवात झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर एकूण नऊ सत्राचे आयोजन केले आहे.
मृदगंध या तिसरे सत्रात कविसंमेलन विदर्भतील अकरा ही जिल्ह्यांमधील जवळपास कवयित्रीसह कारंजा लाड येथील शारदा भुयार पण सहभागी होणार आहेत.
वैदर्भीय स्त्री आता गजलेच्या क्षेत्रातही मागे नाही ...म्हणून स्वतंत्र पाचवे गझल मुशायराचे सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील सुप्रसिद्ध गजलकारा अँड मंगलाताई नागरे या गझल सत्राचे अध्यक्ष असणार. आहेत तर नागपूरच्या चित्रा कहाते आणि गोंदिया येथील नूरजहाँ पठाण या गजल सत्राला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आहेत .उज्वला इंगळे कारंजा लाड सह निशा डांगे या सूत्रसंचालन करतील. मा. शीलाताई गहलोत यांच्या अध्यक्षतेत "जीवनगाणे " हे कवी संमेलन दुपारी दोन ते पाच या वेळात संपन्न होत असून अकोल्याच्या मा. प्रतिभा पाथ्रीकर या कवी संमेलनाला प्रमुख अतिथी आहेत. कृपा ठाकरे कारंजा लाड, शरयू जीरापुरे कारंजा लाड ,मयुरी टोपरे कारंजा लाड या कवी संमेलनात सहभागी होतील.
समारोप सत्रात विशेष अतिथी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अकोला येथील मा.पुष्पराज गावंडे उपस्थित राहतील. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेकडे अध्यक्ष संजय कडोळे यांना,अँड मंगलाताई नागरे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....