वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायत येथे आज दिनांक - 15 जून रोजी शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा ग्रामपंचायत येथे घेण्यात आली या परीक्षेत ग्रामपंचायत मध्ये रोजनदारी पदावर कार्यरत वेक्ती ला 100 पैकी 100 गुण मिळाल्याने ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थ्यांने आक्षेप घेत गोंधळ घातल्याने अखेर ही शिपाई पदाची परीक्षा रद्द करण्यात आली यामुळे या पदासाठी मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे.
चिकणी या ग्रामपंचायतमध्ये याची लोकसंख्या अंदाजे 2500 असून या ग्रामपंचायतीत 9 सदस्य निवडून आलेले आहेत, या ग्रापंचायतीमध्ये या गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये शिपाई या पदासाठी जागा नियुक्ती करण्यात आली आहे या पदासाठी
पंचायत समिती द्वारे दि. 30/03/2021 रोजी या शिपाई पदासाठी जाहिरात ग्रामपंचायत येथे नोटीस बोर्ड वर प्रकाशित करण्यात आली होती , या पदासाठी आवेदका द्वारे एकूण 23 बेरोजगार युवकांनी आवेदन भरले होते त्यापैकी 17 आवेदक आज दि. 15 जून ला सकाळी 11 वाजता परीक्षा घेण्यात आली परीक्षेचा कालावधी 1 तासाचा वेळ ठेवण्यात आला त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये 2 ते 3 वर्षापासून हंसराज हेमकांत ताजने हा कार्यरत असलेला वेक्ती यास 100 पैकी 100 गुण मिळाल्याने ग्रा.प. मधील काही सदस्य व गावातील नागरिकांनी या संदर्भात आक्षेप नोंदवल्याने सदर परीक्षा रद्द करण्यात आली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गणेश मुकाडे यांनी दिली
बॉक्स मध्ये घेणे :- वादाचा भोवऱ्यात राहिले शिपाई पद ग्रापंचायत चिकणी येथील 3 निवृत्त झालेल्या शिक्षकांना शिपाई या पदासाठी पेपर काडण्यासाठी सांगण्यात आले होते मात्र या शिक्षकांचेच नाते सबंधीत वेक्ती परीक्षेला बसल्यामुळे या संदर्भात पंचायत समिती BDO यांच्याकडे आक्षेप नोंदविण्यात आला.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती मार्फत ग्रामविकास अधिकारी गणेश मुकाडे यांचाकडे शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आली
चौकट:-
दि. 15 जून ला मौजा - चिकणी ग्रा. प. अंतर्गत शिपाई पदाची लेखी परिक्षेवर सर्व परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षा पंचासमितिच्या सभागृहात विडिओ माध्यमाद्वारे घेण्यात येईल असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत याला साहित्य पुरवण्याचे ब्लिचिंग पावडर कागद अशा प्रकारचे टेंडर भद्रावती येथील ऑपरेटरला मिळाले असून या माध्यमातून पेपरची विक्री लाख रुपयाच्या वरून झाली असून अन्य परीक्षार्थी यासही याबाबत अन्य सहकार्याकडून फोन द्वारे माहिती देण्यात आली असल्याची चर्चा या ग्रामपंचायतीमध्ये होत असून यामध्ये पैशाच्या घेवानदेवीवरून हे पेपर फुटीचे प्रकरण झाले असल्याचे गावातील नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले