नागभीड पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या जनकापूर बसस्टॉप जवळ दोन मोटारसायकली एकमेकांना समोरासमोर न धडकल्याले तिघे गंभिर जखमी झाल्याची घटना येथे घडली. सायंकाळी जनकापूर येथे गोसेखुर्द कालव्याच्या कामावरून दोन मजूर नामें स्वप्निल रोकडे, व उमराव तिजारे रा. नवेगाव (पांडव) हे दोघेही दुचाकी क्रमांक एम. एच. 34- ए. एफ. 6369 ने गावांकडे जात होते. दरम्यान जनकापूर पाट्यावर वळण मार्गावर नागभिड कडून येत असलेले नामे बाजीराव समर्थ पेढरी व करण आळे सिन्देवाही हे दुचाकीने सिवाही कडे जात असताना जोरदार धडक दिल्याने या अपघातात तीन जन जखमी झाले. या अपघातात स्वप्निल राकडे हे गंभिर जखमी झाला.