कारंजा : सणांचा राजा दिवाळी सण संपल्यामुळे लवकरच आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, निवडणुकाची रणधुमाळी सुरु होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदला प्राप्त झाली असून, तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार असल्याचे कळते . सर्वप्रथम ७६०० ग्रामपंचायती व त्यानंतर महापालिका व नगरपालिका निवडणूक पार पडणार आहेत. त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
१) ग्रामपंचायत निवडणूक : २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२.
२ ) महापालिका, नगरपालिका : २० डिसेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३..
३ ) जिल्हा परिषद, पंचायत समिती : ३० जानेवारी२०२३ ते २० फेब्रुवारी. २०२३.