अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबविले जात आहेत.*दि.२० जुलै २०२५ रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट अबू तर्फे अकोल्यातील सेवा केंद्रावर दिव्यांग सक्षमीकरण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभागाचे अधिकारी व अकोल्यातील सामाजिक संस्थांचे सदस्य उपस्थित होते.या लोकार्पण सोहळ्याची सुरुवात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व *संगीतकार डॉ.विशाल कोरडे यांच्या स्वरचित गीताने करण्यात आली.हमको मन कि शक्ती देना, श्रद्धा विश्वास कि भक्ती देना..या गीतांचे गायन संस्थेच्या सदस्य अनामिका देशपांडे व तन्वी दळवे यांनी केले.बासरीवर साथसंगत पं.हरीप्रसाद चौरसिया यांची शिष्या डॉ.मोनाली तिडके यांनी केले.या प्रस्तुती करणाला तांत्रिक सहकार्य गणेश सोळंके व अस्मिता मिश्रा यांनी केले.उपस्थित सर्व रसिक श्रोते,दिव्यांग बांधव व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी या संगीतमय प्रस्तुती करणाचे कौतुक केले.येणाऱ्या गणेश उत्सव, दुर्गा उत्सव व सामाजिक उपक्रमासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली आहे .आपण सुद्धा या संगीतमय कार्यक्रमाला निःशुल्क आयोजित करु शकता.अधिक माहिती करीता ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा* असे आवाहन डॉ.संजय तिडके व पुजा गुंटिवार यांनी केले आहे .