अतिशय शांत, संयमी, असणारे राजेंद्रजी पाटणी साहेब सामान्यांचे समस्या सोडविताना, त्यांच्या प्रश्नांची उकल करतांना वेळ प्रसंगी कठोरपण बनलेत.लोकांचे प्रतिनिधित्व करतांना एखाद्या विषयात त्यांना न्याय देण्यासाठी प्रश्नांचे गांभीर्य जाणुन प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ,आपले मत अत्यंत प्रभावीपणे पटवून देऊन ,ते कायद्याच्या वा नियमाच्या चाखोरीत योग्य असल्याचे सप्रमाण पटवून देऊन ,यात सामान्यहीत असल्याने मान्य करण्यायोग्य असल्याने मान्य वा मंजुर करून घेण्याचे कसब आमदार राजेंद्रजी पाटणी साहेबांकडे असल्याचे आपण अनेकदा अनुभले असुन अख्खा मतदार संघ यापासून अनभिज्ञ नाही.
सर्वच स्तरावर आपली प्रचंड छाप ठेवत आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी मतदारसंघात व जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण केला आहे लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला .लोकांची व्यक्तिगत, सार्वजनीक काम केलीत त्या विश्वासावर जिल्ह्यात आज अग्रगण्य नेतृत्व राजेंद्रजी पाटणी साहेबांचे रूपाने उभं झालं. आज जिल्यात मानाने, सन्मानाने पाटणी साहेबांचे नाव अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं.
भाजपाने त्यांचेकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबादारी दिली. ती त्यांनी सार्थ ठरवीत अनेक आघाड्यावर पक्षीय क्षेत्र व्यापक बनवीत सर्व सामान्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षीत करीत त्यातील गुणीजणांचा आदर करीत त्यांना पक्ष पदाधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या सोपविल्यात आणि या सर्वांच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत केलं.
पाटणी साहेबांचे व्यक्तिमत्व लोकमान्य आहे. लोकांची मान्यता असल्याने जिल्हाभर व राज्यात लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे त्यांना मानणारा मोठा लोकसंग्रह आहे. राजकारणात व समाजकारणात त्यांनी आपला परिपुर्ण वेळ दिला आहे. सामान्य लोकांसाठी जिवनातील अमुल्य वेळ देत राजकारण करीत असताना राजकारण व समाजकारण अगदी जवळुन आत्मसात केले. त्यात मिळालेली परीपक्वता समाजहित साधन्यास उपयुक्त ठरत आहे.
वाशीम जिल्ह्यात आमदार राजेंद्रजी पाटणी यांचेकडून जिल्हावासीय मोठे आशावादी असल्याचे आपण नेहमी बघतो. कारंजा मानोरा मतदार संघाचे बहुतांश मतदार त्यांचे वर निष्ठा ठेवून असुन त्यांना मनापासून मानतात .जिल्हाभरातून लोकं आमदार राजेंद्रजी पाटणी यांचेकडे त्यांचे गऱ्हाणे ,त्यांच्या समस्या घेऊन येतात कारण लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास.
मतदारसंघात किंवा जिल्ह्यात ,काम करतांनी आमदार साहेब आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकास न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात .
शेतकऱ्यांचं भलं झालं पाहीजे त्याची उन्नती झाली पाहीजे त्याची आर्थिक स्थिती मजबुत झाली पाहिजे ,त्यांचे कडे असणाऱ्या शेताला रस्ता असला पाहीजे, त्यांचेकडे वीज कनेक्शन असलेले पाहिजे, त्यांचेकडे शेतात पिकांना देण्यासाठी भरपुर पाणी असले पाहिजे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहीजे, त्याची मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजे असे ज्यांना मनोमन वाटते व त्यासाठी प्रयत्न करणारे, मार्गदर्शन करणारे पाटणी मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी खरोखर शेतकऱ्यांचे मित्रच असल्याचे माझे मत आहे.
मतदारसंघात शेत पाणंद रस्ते ,अनेक गावं नवीन रस्ते टाकून जोडण्यात आले, अनेक ठिकाणी कामे करण्यात आली. अनेक शासकीय कार्यलय इमारती उभ्या झाल्यात, अनेक प्रस्तावित आहेत. मार्ग ,महामार्गाचे काम करण्यात आलीत.आमदार निधीतून ,वेगवेगळ्या शीर्षकाखाली आलेल्या निधीतून अनेक विकास काम करण्यात आलीत अनेक प्रस्तावित आहेत. तांडावस्ती, वस्ती निधी व ईतर निधीतील काही काम प्रगतीपथावर आहेत .काही काम निधी अभावी प्रलंबित आहेत त्याकरिता आमदार साहेब प्रयत्न करीत आहेत.संघर्षरत राहुन हवं ते मिळविण्यात साहेब निष्णात आहेत .बहू आयाम असलेले असलेले पाटणी साहेब आपल्याकडे असणारी संपूर्ण ताकद ही जनसेवेत लावतात.
सध्या 2023 ला त्यांच्या वाढदिवसाचे मुहूर्तावर विविध विकास कामांचे भूमिपूजन कारंजा शहरात संपन्न होत आहे. त्यांच्या विकासाचा कामांचा वेग बघता त्यांनी केलेला विकास व करीत असलेले विकास कामे याची तुलना इतरांसी होऊ शकत नाही. कारण त्यांचा आलेख या बाबतीत उंचच आहे. त्यामुळे निवडणूक परिणामही साहजिकच त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित असल्याचे घोतक आहे. मतदासंघांसाठी कोटयावधी रुपये निधि आणला शहर व तालुक्याची कामे सुरू आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय घेवुन निघालेलं हे व्यक्तिमत्त्व खरोखर उत्तुंग आहे. या व्यक्तीस सर्व सामान्य माणूस आपले मानतो. यांना भेटण्यासाठी किवा काम करण्यासाठी कोण्या मध्यस्थाची गरज नाही. कोणाचेही काम सहज करून देणारे म्हणुन यांचेकडे समस्याग्रस्त माणसांचा कल जास्त आहे. सर्वांचे समाधान येथे आहे.
पाटणी साहेबांचा वाढदिवासानिमित्य त्यांना शब्दबध्द करण्याचा माझा प्रयत्न तोकडा आहे कारण काही व्यक्तिमत्त्वच असे असतात की त्यांच्या कार्यसिमा, कार्यक्षेत्र आपल्या दृष्टीक्षेपापलीकडचे व काहीअंशी अनाकलनिय असते त्यामुळे त्यांना शब्दबध्द करणे कठीण जातं.
दिं 19 जून रोजी राजेंद्रजी पाटणी साहेब यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसानिमित्य अनेक शुभेच्छा .
लेखक :- राजीव भेंडे, तालुका उपाध्यक्ष भाजपा.
आपल्या प्रतिक्रिया द्या....