वाशीम : वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील, दिर्घानुभवी दिग्गज आमदार म्हणजेच दारव्हा दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट वनमंत्री, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेगटाचे कट्टर शिवसैनिक आणि तळागाळातील भटक्या विमुक्त समाजाचे आशास्थान संजयभाऊ राठोड यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाकडे त्यांच्या चाहत्याचे लक्ष्य लागले असून, दुर्लक्षित वाशिम जिल्ह्याचा विकासाचा अनुषेश भरून काढण्याकरीता,वाशिम जिल्हा पालकमंत्री म्हणून,स्थानिक यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातीलच आमदाराची संजयभाऊ राठोड यांचीच वर्णी लागावी. असे स्थानिक मतदार नागरीकांचे मत असल्याचे, भटक्या विमुक्ताचे स्थानिक नेते, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.