कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा मनसेच्या वतीने,गुरुवारी दि 13 जुलै रोजी, सकाळपासून तर संपूर्ण दिवसभर स्थानिक झाशी राणी चौक बायपास कारंजा येथे,महाराष्ट्रात चाललेल्या भ्रष्ट राजकारणावरून जनतेने "एक सही संतापाची" या मनसेच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शेकडो मतदारांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपली सही करून सर्व पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध पूर्ण महाराष्ट्रात जनतेमधे तीव्र विरोध होत आहे. याकरिता मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी यांना "एक सही संतापाची" ही स्वाक्षरी मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवायला सांगितली होती. या मोहिमेस वाशिम जिल्ह्यातील सर्वच विभागात उत्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
व मतदार राजा आपली भावना सही करून येथे व्यक्त करत आहेत. सर्व काही सत्ते साठी,पैशासाठी ,हव्यासापोटी विकृत राजकारण सुरू आहे. जिल्हा अध्यक्ष राजू पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हा भर ही मोहीम सुरू आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर,तालुकाध्यक्ष माणिक राठोड,शहराध्यक्ष हरीश हेडा,शहर सचिव कपिल महाजन,शहर उपाध्यक्ष चेतन ढीके,संतोष धाकुलकर,इशांत देशमुख,तालुका उपाध्यक्ष फिरोज खान,अनिल जाधव,भारत हांडगे,विक्की सारवान,अंकुश बासोळे, विक्रांत बासोळे,उके,जाधव, वानखडे तसेंच कार्यकर्ते पदाधिकारी बहु संख्येने हजर होते. असे वृत्त मनसेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....