वन परीक्षेत्र कार्यालय मालेवाडा येथे मा. साबळे साहेब येडसकुही यांचे मार्फत येडसकुही उपक्षेत्रातील वनरक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरीक्षेत्र अधिकारी मा. नवले मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कोटगुलचे क्षेत्र सहाय्यक मा. साखरे साहेब गोडरीचे क्षेत्र सहाय्यक मा. राऊत साहेब, वनरक्षक सुनिल हिडामी, वनरक्षक नीलिमा पुंघाटे, वनरक्षक पौर्णिमा मून तसेच कार्यालय प्रमुख डांगे साहेब सत्कारमुर्ती बि. एल. भानारकर व कु. एस. झेड. कोरेत मॅडम यांना शाल व भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षेत्र सहाय्यक साबळे साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन हिडामी साहेब यांनी मानले. या कार्यक्रमात मालेवाडा वन परीक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी, वनमजूर उपस्थित होते.