गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारंजा येथील गुरुदेव प्रेमी तथा आर्ट ऑफ लिव्हिंग कारंजा (लाड) यांच्या वतीने साई संकुल कारंजा येथे, मंगळवार दि .१० मे २०२२ ते रविवार दि . १५ मे २०२२ पर्यंत सकाळी ०६:०० ते ०९ : ०० पर्यंत " आनंद अनुभूती शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये योगा, प्राणायाम ,ध्यान व सुदर्शन क्रियेद्वारे जीवनातील आनंद, उत्साह आणि प्रेमाची अनुभूती घेता येईल . तसेच त्याकरीता आयोजकांकडून नाव नोंदणी करता http://aolt.in/626063 ही लिंक देण्यात आली असून इच्छुकांना सदर्हु लिंक द्वारे शिबीरामध्ये सहभागी होता येईल अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराचे विशाल पाटील डहाके यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिली आहे . तसेच याशिवाय गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित रविवार दि . १५ मे २०२२ रोजी सकाळी ०९:०० ते १२:०० या वेळेत स्थानिक महेश भवन कारंजा [ लाड ] येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी जास्तित जास्त दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान करून आर्ट ऑफ लिव्हींगच्या राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे .