वाशिम :(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड)तालुक्यातील स्थानिक कारंजा (लाड)महेश भवन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कारंजा (लाड) - मानोरा विधान सभा क्षेत्रातील कारंजा (लाड)तालुका, मानोरा तालुका, कारंजा (लाड)शहर येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित मोदी 9 व्यापारी संमेलन मान्यवरांच्या व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
भारत भारत राहिला पाहिजे आणि हिंदुस्थान हिंदुस्थान राहिला पाहिजे याकरीता मोदी पाहीजेत असे प्रतिपादन अनिल बोंडे यांनी देशासाठी मोदींची आवश्यकता सांगताना सांगितले . आमदार, खासदार यांनी आपण केलेल्या कामाचे रिपोर्ट दिले पाहिजे.जनते पर्यंत केलेल्या कामाची माहीती दिली पाहीजे. देशात मोदींनी केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हे जन संपर्क अभियान आहे. कार्यक्रमात अनील बोंडे यांनी मार्गदर्शन करतांनी सांगितले. तसेच आम्ही सर्व मोदीजी सोबत असल्याचे सर्व उपस्थितांनी आपले हात उंचावत यावेळी अनिल बोंडे यांच्या प्रश्नास प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास मार्गदर्शन करताना संजय केळकर यांनी सांगितले की, सरकारने केलेले काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. मोदी 9@ माध्यमातून भाजपा कार्यकर्ता प्रत्येकांपर्यंत पोहचत आहे. देशातील व्यापाऱ्यांसोबत मोदी आहेत असे व्यापारी संमेलनात ते बोलतांना पुढे म्हणाले की देशाचा विकास मोदींनी केला. दिवाळीत मोदी लष्करा सोबत दिवाळी साजरी करतात. कोविड काळात देशात लस उपलब्ध झाली परदेशात पाठविली. मोदींनी 370 कलम हटविले. काश्मीर मध्ये तिरंगा फडकत आहे. पूर्वी आंदोलन करावी लागत होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीसी सर्वांनी उभं रहावे. त्यांच्यावर आपले आशीर्वाद, प्रेम असू द्या. असे सांगुन त्यांनी मोदींना नमन करत, सलाम करत आपले मार्गदर्शन संपविले.
मोदी @9 व्यापारी संमेलन करीता या क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी यांनी केले होते.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.ना. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जून महिन्यात भाजपातर्फे देशभर विशेष जनसंपर्क अभियान राबविल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कारंजा मानोरा मतदार संघात मोदी @9 व्यापारी संमेलनाचे आयोजन होते.

या कार्यक्रमात आ.संजयजी केळकर,आमदार,ठाणे विधानसभा,खा.डॉ. अनिलजी बोंडे, लोकसभा मतदारसंघ क्लस्टर प्रमुख ,भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ व लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख नितीनजी भुतडा, सुनील मालपाणी, सुनीलजी राजे, नागेश घोपे, प्रा.सुनील काळे, पुरुषोत्तम चितलांगे, विजय काळे,सौ. प्राजक्ता माहितकर,अनिल कानकिरड ,डॉ राजीव काळे, ललित चांडक, ठाकूरसिंग चव्हाण, मा.श्री.प्रकाश ढेरे,सुनिल जवाहरमलानी ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सूनील मालपाणी यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा.सुनिल काळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सरचिटणीस शशी वेळूकर, उपाध्यक्ष राजीव भेंडे ,युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले, संतोष गुल्हाने, दिनेश वाडेकर, मोहन पंजवाणी, सविज जगताप इत्यादिसह अन्य कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.असे वृत्त आमचे जिल्हा प्रतीनीधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....