कालावधीत नैसर्गिक शेतीमधून ग्रामआरोग्य व ग्रामस्वराज्य या विषयावर पद्मश्री कृषीऋषी डॉ. सुभाष पालेकर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता गडचिरोली येथील लेखामेंढाचे देवाजी तोफा यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर रात्री ८ वाजता कीर्तन होणार आहे. मंगळवारी १८ एप्रिलरोजी रामधून, ग्रामदिंडी शहरातून काढण्यात येणार आहे. यानंतर दिवसभरात डॉ. शरद निंबाळकर, भास्कर पेरेपाटील यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोपीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार, सुबोधदादा, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार उपस्थित होते.