ब्रम्हपुरी :
_गेल्या कित्येक वर्षांपासून ओबीसी समाज हा हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. भारतीय संविधानानुसार ओबीसी समाजाला मिळणारे आरक्षण हे अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे समाजाचा सर्वांगीन विकास खुंटला आहे. परिणामी ओबीसी समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीस खीळ बसली आहे. ओबीसी समाज वंचित असून समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी ओबीसी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी संभाजी ब्रिगेड तालुका ब्रम्हपुरीचे तालुकाध्यक्ष सुरज तलमले यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ब्रम्हपुरीच्या नायब तहसिलदार मनीषा देशमुख यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले._
_यात, सन २०२१च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, सरकारी नोकरीतील ओबीसी, एस.सी, एस.टी.चा बॅकलॉग विशेष अभियान राबवून भरण्यात यावा, एस.सी, एस.टी., प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळण्यात यावी, एस.सी व एस.टी. प्रमाणे ओबीसी शेतकरी व शेतमजूर यांना शासनांच्या विविध योजनांचा फायदा मिळावा, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण मिळण्यात यावे, कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करू नये, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसींना लावलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी आरक्षण करीता बिहार राज्या प्रमाणे सर्वपक्षीय बैठक आयोजित करून जतनिहाय जनगनणा करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेड तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ब्रम्हपुरीचे नायब तहसिलदार मनीषा देशमुख यांच्या मार्फत प्रेषित करण्यात आले._
_यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका ब्रम्हपुरी चे तालुकाध्यक्ष सुरज तलमले, शहराध्यक्ष राजेश माटे, संभाजी ब्रिगेड ग्रामशाखा कोलारीचे ग्रामपंचायत सदस्य दीक्षित बागडे, पराग राऊत, वैभव तलमले, विवेक खरकाटे, अविनाश प्रधान, विश्वास हुमने, नंदेश्वर कोसरे, अमित सरजारे, स्वप्नील राऊत, रुपेश मेश्राम व आकाश मेश्राम आदी. संभाजी ब्रिगेड ब्रम्हपुरी व ग्रामशाखेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते._
आपल्या प्रतिक्रिया द्या....