लोकविद्यालय गांगलवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक यांचे दिनाक ०१ ऑगस्ट मंगळवार ला सकाळी आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
पूर्वविदर्भात ओबीसी चळवळीच्या अगदी सुरूवातीच्या काळात चळवळीचा प्रचार प्रसार करण्यात ज्यांनी तनमनधनाने , अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे अथक परिश्रम घेतले असे ओबीसींचे प्रमुख मार्गदर्शक वामनरावजी भोयर गुरूजी यांचे आज १ ऑगस्ट २०२३ ला दिर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने अत्यंत दुःख होत असून ओबीसी चळवळीची फारमोठी हानी झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सूना व नातवंड असा बराच मोठा मोठा आप्तपरिवार आहे.
मूळचे ते धुम्मनखेडा वॉर्ड ब्रम्हपुरी येथील रहिवाशी असून नौकरी करीता गांगलवाडी येथे ते स्थायिक झाले.