वाशिम : सर्वच राजकिय पक्षाचे उमेद्वार एकीकडे आपल्या प्रचाराची रणधुमाळी उडवीत असतांना व प्रचारा करीता लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असतांना पत्रकारांना मात्र जाहिराती पासून डावलण्यात येत आहे. "जी पत्रकार मंडळी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून राजकीय पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे पुढारी हेण्याचे भाग्य घडवून त्यांना निवडणूकीत उमेद्वार होण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून देत असतात. त्याच पत्रकारांना, उमेद्वार आणि त्यांचे राजकिय पक्ष आज रोजी जाहिरात देण्यापासून अक्षरशः टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे ग्रामिण भागातील लघुपत्रकारामधून उमेद्वार व राजकिय पक्षाविषयी नाराजीचा सूर उमटत असून, जाहिराती नसतील तर उमेद्वाराच्या सभा, बैठकांना जायचे नाही आणि यांच्या बातम्यांना आपल्या वृत्तपत्ता मधून अजीबात प्रसिद्धी द्यायची नाही. असा निर्णय महाराष्ट्र राज्यस्तरिय ग्रामिण पत्रकार परिषद अकोला आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय मराठी पत्रकार परिषदे सर्वामुनते घेतला असल्याचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले असून निवडणूक काळात कोणत्याही उमेदवाराच्या बातम्यांना, संघटनेचे पदाधिकारी संपादक पत्रकार प्रसिद्धी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.