! "प्रसिद्ध उद्योजक ललित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली,डान्स दिवाणे फेम,रील स्टार मुंबई तथा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत 'गरबा नाईटस्'चा झाला शुभारंभ."
*कारंजा (लाड)* : जी.एन.डान्स स्टुडीओ आणि आदिगुंज बहुउद्देशीय संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने, नवरात्रौत्सव-नवदुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमिवर,महिलांचे विशेष आकर्षण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून, "गरबा-नाईटस्" कार्यक्रमाचा शुभारंभ, मंगळवार दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन जी.एन. डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय सर आणि नम्रता राठोड मॅडम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असता, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या 'डान्स दिवाणे' फेम अभिनेत्री आणि रील स्टार वर्षा साळुंकी,मुंबई यांच्या आगमनाने गरबा खेळणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये नवा उत्साह व आनंद दिसून येत होता.या संदर्भात अधिक वृत्त असे की, जी.एन.स्टुडिओज कारंजा प्रस्तुत 'गरबा नाईटस्' कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ कारंजा नगरीतील सुप्रसिद्ध उद्योजक ललितजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुली आणि महिलाचे विशेष आकर्षण ठरणारी अभिनेत्री रिल्स स्टार वर्षा साळुंकी मुंबई आणि प्रमुख पाहुणे कारंजा येथील न.प. मुख्याधिकारी यांच्या सौभाग्यवती वाघमोडे मॅडम, विजया महिला क्रेडिट सोसायटीचे संचालक प्रा. रघुवंशी सर, गोदावरी बँकेचे शाखाधिकारी भारत राठोड, प्रशिक पतसंस्थेचे अध्यक्ष आकाश कऱ्हे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोळे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वेळूकर, आदिगुंज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी खंडारे, धाबेकर महाविद्यालयाचे अधिक्षक राजेशजी अढाऊ, श्रीराम फायनान्सचे संदेशजी ठाकुर, लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक मंगेशजी कडेल, अंबादासजी चव्हाण, पत्रकार शेषरावजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चनाताई कदम, सौ. रश्मीताई उजैनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मॉ दुर्गादेवीचे पूजन व महाआरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.लगेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत जि.एन डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय सर व नम्रता राठोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात येवून रिल्स स्टार वर्षाताई सोळंकी यांचा भव्य सत्कार जि.एन.डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय आणि नम्रता राठोड यांचे सह सभासदांचे हस्ते करण्यात आला. शुभारंभ कार्यक्रमाचे सुत्र संचलन गिरीष जिचकार यांनी केले.त्यानंतर आनंदी व उत्साही वातावरणात रात्री उशीरा पर्यंत मुली व महिलांनी गरबा नृत्याचा अविष्कार सादर केला. यामध्ये कारंजा शहरातील जवळ जवळ ४०० ते ५०० महिलांनी सहभाग घेतला.याकरीता गगन रॉय व नम्रता राठोड मॅडम यांनी दिनांक ०७ सप्टेंबर पासून मुली व महिलांना गरबा नृत्य प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणा करीता प्रशिक्षक म्हणून किरण पुरोहित,दृष्टी पटेल नवसारी सुरत,अक्षय राऊत वाशीम, बालकृष्ण गौर वापी गुजरात, हनी राठोड सर ,अर्पिता मॅडम अहमदाबाद, वाशीमची पियू यांनी अथक परिश्रम घेऊन कारंजा येथील महिलांना उत्कृष्ठ असे प्रशिक्षण दिले. एकंदरीत गरबा नाईटसचा शुभारंभ धाबेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात थाटामाटात पार पडला. पुढे 'गरबा नाईट' कार्यक्रम दि . ०१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत चालणार असल्याचे कळविण्यात आले आहे.