आज जागतिक ब्रेल दिन म्हणजे च लुईस ब्रेल यांची जयंती.ब्रेल लिपीचे जनक म्हणून लुईस ब्रेल यांची ख्याती जगविख्यात आहे. लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी १८०९ रोजी कुप्रे (फ्रेंच) नामक एका खेडेगावात झाला. लुईस ब्रेल हे 3 वर्षाचे असताना वडिलांच्या कार्यशाळेत गेले तेवढ्यात वडीलांचे अनुकरण करण्याच्या नादात धारदार आरी अनावधानाने एका डोळ्यात घुसली त्यांना खूप मोठी दुखापत झाली आणि त्यांना कायमचे अंधत्व आले. लुईस ब्रेल लहानपणापासून स्वावलंबी व अभ्यासात हुशार होते,केवळ श्रवणाच्या जोरावर त्यांनी केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.ते फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक,शिक्षक होते. त्यांनी एक विशिष्ट लिपी शोधली जी पुढे अंध व्यक्तींना शिक्षणाचा स्त्रोत बनली. त्यांच्या नावावर ह्या लिपीला *"ब्रेल लिपी"* असे नाव देण्यात आले. ही लिपी अशी होती की जाड कागदावर लिहिलेले शब्द चाचपडून वाचता येईल. पण लुइस ब्रेल यांनी या लिपीमध्ये अनेक आवश्यक बदल केले आणि 1829 मध्ये लुईस यांनी 6 बिंदूवर आधारित ब्रेल लिपीचा शोध लावला. आज अनेक अंध बांधवांना दिव्यदृष्टी देण्याचे मोठे कार्य लुईस ब्रेल यांनी केले. आज दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संपूर्ण विश्वात ब्रेल लिपी चा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने ब्रेल लिपी प्रशिक्षण वर्ग आणि लुईस ब्रेल जयंती चे आयोजन करण्यात येत आहे.अपंग व्यक्तींच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे,त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा साक्षात्कार करून त्यांना जगण्याची उभारी देणे अतिशय महत्त्वाचे आहे.आपण जे करू शकतो ते सर्वकाही ते ही करू शकतात..म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. हीच संधी विदर्भात प्रथमच दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत संस्थेतर्फे उपलब्ध होत आहे. ही संस्था दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर आपले कार्य करत आहे*. समाज कल्याण विभागातर्फे आदर्श संस्था पुरस्कार सदर संस्थेला प्राप्त झाला आहे .आपल्या सभोवताली असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना आपण दिव्यांग सोशल फाउंडेशन पर्यंत पोहोचवू शकता, त्यांच्यासाठी सामाजिक व आर्थिक योगदान देऊ शकता.आपल्या वाढदिवसाला व शुभ प्रसंगी फक्त 365 रुपये देणगी देऊन मदत करू शकता.या निधीतून दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक गरजा पुरवल्या जातात.ज्याद्वारे तो दिव्यांग व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकतो. त्याकरता गुगल पे व फोन पे क्रमांक आहे ०९४२३६५००९० .अधिक माहिती आपण दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या फेसबुक पेज,इंस्टाग्राम पेज व युट्यूब चॅनल च्या माध्यमाद्वारे मिळवू शकता*. धन्यवाद!
लेखक: प्रा.विशाल विजय कोरडे (संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन,अकोला व सहाय्यक प्राध्यापक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला)