कारंजा (लाड) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थी निराधारांनी आधारकार्डला मोबाईल लिंक करून घ्यावेत. अशी सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे. व ज्या लाभार्थ्यांनी तहसिल कार्यालयात अद्याप पर्यंत आपले अपडेट केलेले आधार कार्ड झेरॉक्स प्रत दिलेले नसतील त्यांनी (लगेच) दि. 15 जुलै 2024 पर्यंत आपले आधारकार्डची झेरॉक्स प्रत तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागात देवून सहकार्य करावे.यापुढे निराधारांना वेळ न दवडता अविलंब अर्थसहाय्य मिळावे. म्हणून शासनाकडून थेट हस्तांतरण डीबीटी द्वारे आधारकार्डवर अर्थसहाय्य पाठवीले जाणार आहे. व ज्यांनी तहसिल कार्यालयाच्या संगोयो विभागाकडे अद्यावत केलेले आधारकार्ड दिलेच नाही त्यांचे अर्थसहाय्य रखडल्या जाऊ शकते. त्यामुळे शेकडो निराधारांना, अर्थसहाय्याला मुकावे लागेल. म्हणून प्रत्येक संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड पोहचवावे.तसेच सदरहु वृत्त वाचणाऱ्या सद्गृहस्थांनी आपल्या गावात किंवा घराशेजारी राहणाऱ्या प्रत्येक निराधारांना ही माहिती द्यावी. असे आवाहन संबधीत विभागाकडून करण्यात आले आहे.