आर्थिक उलाढालीमध्ये सर्वात मोठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती गणल्या गेली आहे. निवडणूक जाहीर झाली असून येत्या 28 एप्रिलला निवडणूक होणार असून धुरंधर दिग्गज आपले नशीब अजमाविणार आहे.
यापूर्वी बाजार समितीवर माजी मंत्री स्व. दादासाहेब देवतळे, माजी मंत्री संजय देवतळे यांच्या गटाची सत्ता वर्षानुवर्षे राहिली. मध्यंतरी विधानसभेचे माजी उपसभापती स्व. ऍड. मोरेश्वर टेमुर्डे यांची सत्ता होती. काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांचे स्वराज्य संस्था राजकारणात वर्चस्व राहिले. त्यानंतर मात्र खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आपला गट उतरविला आणि त्यांनी विजय मिळविला.मागीलवर्षी 3 कोटी 26 लाख उलाढाल असलेली बाजार समिती वरोरा निवडणूक भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासाठी महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत पक्ष जरी नसला तरी पॅनल चे माध्यमातून निवडणूक लढली जातात. मात्र राजकीय पक्ष नेत्यांचे वलय मात्र पॅनल सोबत असते. यावेळी शिवसेना पक्ष वेगळा लढत असला तरी काँग्रेस विरोधात मात्र इतर पक्ष एकवटले असून काँग्रेस चा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आम्ही बाजार समितीचे माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करणार, कुठल्या योजना आणणार अशी आश्वासने व प्रलोभने देत निवडून येण्यासाठी रणनीती आखतांना दिसून येत आहे.
येत्या 28 एप्रिल ला बरोरा, शेगाव, माढेली, टेमुर्डा, या ठिकाणी मतदान होणार असून मतदार यादीनुसार 777 सेवा सहकारी संस्थेचे मतदार, 619 ग्रा. प. चे मतदार, 92 अडते व्यापारी मतदार, 56 हमाल मापारी मतदार हे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करणार आहे. पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 18 जण निवडून येणार असून सेवा सहकारी संस्थांमधून 11, ग्रा. प. मधून 4, अडते व्यापारी मधून2, आणि 1 हमाल निवडून येतील.
निवडणुकीत माजी सभापती राजू चिकटे, डॉ. विजय देवतळे, ऍड.. शरद कारेकार, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, प्रमोद मगरे, सरपंच विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, बाळू भोयर, दत्ता बोरेकर, विशाल बदखल, आदि राजकारणी दिग्गज निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....