ब्रम्हपुरी:-
धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या मंगलपर्वावर, रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी द्वारा अंधश्रद्धा निर्मुलन जनजागृती, व्याख्यान, रिपब्लिकन सेनानी चा सम्मान, रक्तदात्यांचा सत्कार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक वंदनीय राष्ट्रसंत तुकड़ोजी महराज क्रीड़ांगन परिसर, ब्रम्हपुरी येथे दिनाक ८/१०/२०२३ रोज रविवारला दुपारी ३:३० वाजता केलेले आहे.
दुपारी ३:३० वाजता पहिल्या सत्रात प्रसिद्ध झाड़ीपट्टी कलावंत हिरालाल पेंटर यांचा विज्ञानवादी जादुच्या प्रयोगातुन अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे .
दुपारी ५:०० वाजता दूसरे सत्रात, "रिपब्लिकन चळवळ व आजचा युवा वर्ग" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, व्याख्याते म्हणून प्रा आकाश सर, इंजी भैयासाहेब रामटेके, रिपब्लिक साहित्यिक आपले विचार व्यक्त करतील, नंतर रिपब्लिकन चळवळीतील सेनानिचा सम्मान समारोह आयोजित करण्यात अालेला आहे, यामध्ये आपले अख्ख आयुष्य रिपब्लिकन चळवळीसाठी घालविलेल्या रिपब्लिकन सेनानीचा सम्मान करण्यात येनार आहे.
सायं. ७:०० वाजता तिसरे सत्रात राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालची सत्यवाणी या आधुनिक समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी आयोजित कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरीचे संयोजक केशिप पाटील, अध्यक्ष डेनी शेंडे, सचिव रक्षित रामटेके, कोषाध्यक्ष पप्पू फुलझेले तथा संपूर्ण टिम रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी यानी केलेले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....