बाेडधा(हळदा)- ब्रम्हपुरी तालुक्यातील शेवटच्या टाेकावर असलेल्या व सध्या महापुराचा सामना करीत असलेल्या बाेडधा, हळदा,कुडेसावली,आवळगांव आदी गावांतील महापुरामुळे आवागमन बंद असुन मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाता येत नसल्यामुळे व गावातील काही नागरिक तापाने फणफणत असुन तालुका आराेग्य प्रशासनाने तात्काळ आराेग्य शिबीर लावण्याची मागणी बाेडधा येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष दुर्योधन ठाकरे यांनी केली आहे.
परिसरात मुडझा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.मात्र गत काही दिवसांपासून मुडझा दाेन्ही वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असुन नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसात आराेग्य सेवा मिळत नाही आहे.तर दुसरीकडे हेच नागरिक बाेगस डाॅक्टरकडे जाऊन थातुरमातुर असा महागडा उपचार करीत आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील बहुतांश गावात ताप,दुखणा,खाेकला याचे रूग्ण आहेत त्यामुळे आराेग्य प्रशासनाने मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांची पदभरती करून गावागावात आराेग्य शिबीर राबवावे तसेच या परिसरातील शाळांमध्येही ही शिबीरे घेऊन रूग्णांना त्याचा लाभ द्यावा अशीही मागणी दुर्योधन ठाकरे यांनी केली आहे.
सध्या पुरामुळे आवागमन बंद असुन याचा फायदा काही बाेगस डाॅक्टर घेत आहेत.तसेच मुडझा येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आराेग्य व्यवस्था काेलमडली आहे.त्यामुळे येथील रूग्णांना नाइलाजाने महागडा उपचार करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरती करावी.व गावागावात आराेग्य शिबीर लावावे अशी मागणी बाेडधा येथील युवा काँग्रेसचे अध्यक्ष दुर्योधन ठाकरे यांनी केली आहे.