कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): दि. 30 जूनच्या सायंकाळी 05:00 वाजता नागपूर वरून,पुण्याच्या दिशेने, विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस, एम एच 29 बी ई 1819 ही निघाली.रात्री अंदाजे 11:30 ला ही लक्झरी बस कारंजाला पोहोचली.बस मधील काही प्रवाशांनी,हॉटेल राधाकृष्ण येथे जेवण घेतल्याचे कळतेतसेच कारंजा येथून ग्राम शिवनगरचे, शेतकरी तथा हॉटेल धनगरवाडाचे संचालक संजय बहाळे (वय 47) आणि त्यांची पुतणी, प्रशासकिय अधिकारी पदाचे स्वप्न बाळगणारी एमपीएससी ची हुशार विद्यार्थीनी कु.मनिषा विजय बहाळे (वय 21) हे पुण्याला शिक्षणाकरीता जाण्याकरीता बसमध्ये चढले. सदर लक्झरी बस सिंदखेड राजाच्या परिसरातून मार्गक्रमण करीत असतांनाच अचानक बसचे टायर निघून,बस अनियंत्रीत होऊन,दुभाजकाला धडकून, क्षणार्धात दरवाज्याचे बाजूला पल्टी होऊन,रात्रीची वेळ आणि झोपेच्या अधिन असलेल्या प्रवाशांना कळायच्या आतच डिझेल टँकरने पेट घेऊन,गाडी स्फोटमध्ये स्फोट झाल्याने, सर्व प्रवाशी गुदमरले असावे व त्यांना काचा फोडून बाहेर पडण्याची संधीच न मिळाल्याने पंचवीस प्रवाशांचा गाडीतच कोळसा झाला.
तर मृत्युच्या दाढेतून,आठ प्रवाशी मागच्या बाजूने कसेबसे बाहेर पडून जीव वाचवीण्यात यशस्वी झाले असावेत. 1 जुलैच्या संपूर्ण दिवसभर दूरदर्शन च्या विविध वाहिन्यावरून,या घटनेचे वृत्त प्रसारीत होत होते. आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभरात ह्या घटनेची व घटनेच्या चौकशीची चर्चा रंगत होती.कदाचित या घटनेने विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले असते.समृद्धी महामार्ग हा निर्मिती पासूनच मृत्युचा सापळा होऊ पहात असून,या मार्गावर दररोजच,ठिकठिकाणी भिषण असे जीवघेणे अपघात होतच आहेत.आणि एका पाठोपाठ एक अशा शेकडो घटनामध्ये प्रवाशी जीव गमवीत आहेत.सदर लक्झरी बसमधील एक चालक आणि एक वाहक वाचल्याचे सुद्धा वृत्त आहे.त्यामुळे या घटनेला वाचा फुटणे व मृतकांना न्याय मिळणे आवश्यक असतांना मात्र,दि 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेत सहभागी करून ,अनपेक्षित पणे दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार होणे.म्हणजे यामागे काय गौडबंगाल असावे ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.हा विस्तार काही दिवसांनी होऊ शकला नसता काय ?
तसेच विस्तार होताच,जीवघेण्या भिषण अपघाताची चर्चा बंद होऊन, दूरदर्शनच्या सर्वच खाजगी वाहनांवर केवळ मंत्रीमंडळ विस्ताराच्याच चर्चांना उधाण आलेले आहे.त्यामुळे अपघाताने आक्रोश करीत असलेल्या भोळ्या भाबळ्या जनतेचे लक्ष्य विचलीत करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? असी चर्चा जनतेमध्ये होत असल्याचे दिसून येत असल्याचे कळते.अखेर यामागचे सत्य काय ? ज्याचे त्यालाच माहीत.पण निदान यापुढे तरी खाजगी वाहने ? वाहनांवरील प्रशिक्षीत चालक ? आणि समृद्धी महामार्गाची शहानिशा होऊन पुढील संभाव्य अपघात टाळता येतील का ? ह्याकडे सरकारने आपले लक्ष्य वेधणे जरूरी आहे.