चंद्रपूर : शेतावर जाण्यासाठी पूर आलेल्या नाल्यातून बैलगाडीने मार्ग काढीत असताना पूराच्या प्रवाहाने बैलजोडीसह शेतकरी वाहून जात असताना नाल्यालगत असलेल्या शेतक-यांनी समयसुचकतेने सदर शेतक-यांसह बैलजोडीला वाचविण्यात यश आले आहे.
गहिनीनाथ वराटे असे शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याच मालकीची बैलजोडी होती.
कोरपना तालुक्यातील नांदा येथील नाल्याला आलेल्या पूरात दोघांव्यक्तींसह बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक घटना घडली आहे.. मागील दहा दिवसांपासून हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी आहे रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैल जोडीत असलेल्या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी वाहूनजावे लागली.
नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले आहेत. गहिनीनाथ वराटे असे शेतकऱ्याचे नाव असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही साध्या-साध्या दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.