कारंजा : "आपले राज्य, आपला भारत देश, आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान ठेवा. हे राज्य थोर अशा संत महात्म्याची छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे. शिवराय जन्माला आले म्हणून त्यांच्या पुण्याईने आपण सुखी समाधानी जीवन जगत आहोत. आपली वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकत आहे. व कायम फडकतच राहणार आहे. आपल्या धर्मात पावित्र्य आहे.आध्यात्म्य आहे. संस्कृती आहे.भक्तीमार्गाने,निर्व्यसनी, शाकाहारी राहून आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. तुमच्या मोबाईलवर चित्रपट अभिनेते, अभिनेत्रीचे फोटो न लावता तुमच्या आईवडीलांचे फोटो लावा. खरे अभिनेते तर तुमचे आई वडील आहेत.आईवडीलांची सेवा करा." असे प्रतिपादन सुप्रसिध्द युवा किर्तनकार ह.भ.प. शिवलिलाताई पाटील यांनी गुरुवारी दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी, कोहिनूर कॉलनी मानोरा रोड येथील संत गजानन महाराज संस्थान द्वारे आयोजीत श्रीमद्भागवत सप्ताहाच्या व्यासपिठावर किर्तन सादर करीत असतांना केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, येत्या सोमवार दि १३ फेब्रुवारी रोजी ब्रम्हांडनायक संत गजानन महाराजांच्या प्रगटदिना निमित्त प्रसिध्द युवा कीर्तनकार ह.भ.प शिवलीला पाटील यांचें कीर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. संस्थानतर्फे हभप शिवलिलाताई यांच्या किर्तनाकरीता भव्य व दिव्यअसे व्यासपिठ, रसिक श्रोत्यांकरिता भलीमोठी बैठक व्यवस्था, उत्कृष्ट अशी ध्वनिव्यवस्था, पार्किंग व्यवस्था, निःस्वार्थ सेवा देणारे सेवाधारी स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. हे स्थळ जुन्या कारंजा शहरापासून अंदाजे दोन कि. मी.असलेल्या, नविन कोहिनूर कॉलनीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते . वातावरणात गारवा आणि कडाक्याची थंडी पडली होती . परंतु तरी सुद्धा केवळ कारंजा शहरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या चारही जिल्हयातील, पंचक्रोशीतील खेड्यापाड्यांवरील वारकरी, श्रोते, रसिकांचा अंदाजे २० ते २५ हजार लोकांचा जनसमुदाय या कार्यक्रमाला उसळला आणि "न भुतो न भविष्यती" अशा स्वरूपाचा विराट गर्दीचा तरीही शांतता, शिस्तबद्ध असा कार्यक्रम होऊन, कारंजा शहरातील यापूर्वीच्या सर्वच क्षेत्रातील कार्यक्रमाचे विक्रम या कार्यक्रमाने मोडल्याचे दिसून येत होते. असे कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.कारंजा येथील संत गजानन महाराज संस्थान कोहिनुर कॉलनी येथे संध्याकाळी ९ वाजता कीर्तनाला सुरुवात झाली.या प्रसिध्द कीर्तनकाराच्या अमृतमय वाणीतून कारंजा वासीयांनी कीर्तनाचा लाभ घेतला.यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, कारंजा तहसीलदार धीरज मांजरे, भाजपा तालुकाध्यक्ष राजीव काळे,नायब तहसीलदार विनोद हरणे,डॉ.अजय कांत, प्रवीण राठोड,देवेंद्र राऊत, संजय भाऊ भेंडे, प.स.सदस्य दिनेश वाडेकर,पत्रकार किरण क्षार,यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन श्री.संत गजानन महाराज संस्थान कोहिनूर कॉलनी, मानोरा रोड यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रारंभी अनेक मान्यवरांसह संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभाग, विदर्भ लोककलावंत संघटना, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराने,हभप शिवलीलाताई पाटील यांची राजीव भेंडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कारंजेकरांची कुलस्वामिनी असलेल्या श्री कामाक्षा देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला .संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य हा महोत्सव साजरा होत असुन दिं ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य ह.भ.प रामेश्वर महाराज खोडे रा.ईसापूर यांचे अमृतमय वाणीतून श्रीमदभागवत कथा दररोज दुपारी १ ते ४ वाजता आहे.असे आवाहन कोहिनूर कॉलनी येथील श्री.संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष विजय राऊत तसेच संस्थांचे मार्गदर्शक राजिव भेंडे व हर्षल काटोले,कमलेश जाधव पदाधीकारी,सदस्य व परिसरातील कॉलनीतील भाविक भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सुधाकर काळे यांनी केले.या कार्यक्रमाला महसूल विभाग, नगरपरिषद विभाग व पोलीस विभाग तसेच विद्याभारती कॉलेजचे विद्यार्थी, धाबेकर कॉलेजचे विद्यार्थी व आयटीआय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमा करीता राजीव भेंडे यांचे योगदान फार मोठे असल्याचे हभप शिवलिलाताई पाटील यांनी सांगीतले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....