सावली वन विभागाची कारवाई लक्षात घेत पशुधन विकास अधिकारी सावली तालुक्यात मानव व वन्यजीव संघर्षांत धोकादायक ठरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यास वनविभागाला अखेर यश आले. सावली वनपरिक्षेत्रात सदरची कारवाई आज 27 रोजी उपक्षेत्र व्याहाड अंतर्गत करण्यात आली.
मानव व वन्यजीव संघर्ष सातत्याने सुरू आहे. वाघोली बुटी येथे बिबट्या व वाघाच्या हल्ल्यात दोन महिलांचा बळी गेला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वाघीणीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. वनविभागाने व्याहाड उपक्षेत्रात सातत्यानेवाघिणीला जेरबंद करण्याकरिता रेस्क्यू कार्यक्रम सुरू करून माग घेत होते.
चौघांचा घेतला होता बळी:-
सावली तालुक्यात या वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. 30 मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हाच वाघिणीलने त्याला उचलून नेत ठार केले. 18 एप्रिल रोजी चेक विरखल येथील मंदाबाई सिडाम या महिलेवरही हल्ला करून ठार केले.डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांची टीम यांनी दुपारी 12:42 वाजताच्या बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन वाघिणीला जेरबंद केले. सदरची कारवाई मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक निकिता चौरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेंडगे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे,वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण विस्टकर, डॉ. कुंदन पोडचेलवार, संरक्षक पथक तसेच डॉग स्कॉड, परिक्षेत्रातील वन कर्मचारी क्षेत्र सहाय्यक आर. जी. कोडापे, आर. एम. सूर्यवंशी, ए. एन. मेश्राम, एन बी पाटील,सदर वाघीण ही व्याहाड उपक्षेत्रातील गट क्रमांक 114 मध्ये लोकांचे निदर्शनास आला असता वन विभागातील वन कर्मचारी मोक्यावर जाऊन वाघिणीला जेरबंद करण्याची कारवाई सुरू केली. सदर वाघाचे स्थळ एस एन वाकडोत यांनी केली.