मंगरूळपीर :
मंगरूळपीर शहरालगत असलेल्या शहापूर येथील संत गजानन महाराज मंदिर येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महिला भजनी मंडळाची बैठक ता 21 रोजी दुपारी दोन वाजता उत्साहात पार पडली
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई उगले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रसारक अनिताताई राऊत,ज्योती ठाकरे, श्रीकृष्ण नेमाने, सुभाष कोळकर आदी मान्यवर उपस्थित होते
या बैठकीत रूपालीताई गावंडे यांची मंगरूळपीर तालुका अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली तर सुवर्णा गावंडे यांची महिला तालुका उपाध्यक्ष पदी तसेच ललिता राजाराम राऊत यांची तालुका भजन प्रमुख पदी सर्वानुमती निवड करण्यात आली
यावेळी शोभा अंबुलकर, मथुरा तायडे, ज्योती पांडुळे, रंजना निकम,नयना गायकवाड,मंगला चेके,शांता गव्हाणे,सुनंदा चव्हाण,उषा गावंडे दुर्गा गिरे, कीर्तीका ठाकरे,सुनंदा जवंजाळे रेखाताई इंगोले छायाताई इंगोले नीतू बोरकर,राठोड,संध्या धनवे निता खडसे,कल्पना ठाकरे लक्ष्मी गायकवाड,आशा कोळकर,नीता गिरी,मनकर्णा भोसले,राधा कोळकर तसेच अतुल ढगे सचिन धुर्वे,नंदू ठाकरे दिनकर भामुद्रे,आदी उपस्थिती होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....