कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा येथील भटक्या जमातीमधील गवळी समाजाच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाल म्हणून मजूरी करणाऱ्या दारिद्रवस्थेतील एक हमालाच्या आणि महत्वाचे म्हणजे दिव्यांग असूनही सादिया नौरंगाबादी ह्या मुलीने शिक्षणक्षेत्रात चांगलीच भरारी घेतली असून तिचा अकोला येथील शासकिय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. करीता प्रवेश झाल्यामुळे तिच्या वडिलांची मान सन्मानाने उंचावली आहे.तिने घेतलेल्या या उंच भरारीने तिचं डॉक्टर होण्याच स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून,त्यामुळे कारंजा शहरातील विविध संस्था संघटना कडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कौतुक होत आहे.