गटशिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची नावे व अवैद्य पुस्तके हजारो रुपये किमतीची.. याचा गुप्त स्थळ पहाणी अहवाल घेऊन त्यांनी 21 शाळेचा अवैध्य अभ्यासक्रम अधिकृत बाहेर आणला व मनसेला स्वाधीन केला.
शिक्षणाच्या माहेरघर कारंजा शहरात शिक्षणाचा मांडला काळा बाजार
सीबीएससी पॅटर्न बंद न झाल्यास कारंजा मनसे पदाधिकाऱ्यांची आमरण उपोषणची तयारी
*कारंजा(लाड) ता.7*
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा शहरात खाजगी शिक्षण संस्थेकडून, शिक्षणाचा काळाबाजार होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी कारंजा येथील मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. याबाबत
सविस्तर वृत्त असे की ,कारंजा शहरातील 21 खाजगी शिक्षण संस्था यांना राज्य शासनाचा अभ्यासक्रम लागू असून तो अभ्यासक्रम बाजूला ठेवून, सीबीएससी पॅटर्नच्या नावाखाली सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अवैध्यरीत्या फी आकारणी करीत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी कारंजा येथील मनसेचे पदाधिकारी यांना दिली. दिलेल्या तक्रारीचे दखल घेत मनसेने विनापरवाना सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण देत असलेल्या 21 शाळेंवर कारवाई करण्याची मागणी केली.
आपला पाल्यांना उच्च व चांगले शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांचे पालक अवैधरीत्या फी देऊन सुद्धा गप्प आहे.परंतु काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसेला दिलेल्या तक्रारीवरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला असून ,जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित 21 शिक्षण संस्थेवर कारवाईची मागणी केली.या 21 शिक्षण संस्थांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सीबीएससी पॅटर्नचे राज्य शासनाच्या तरतुदीमध्ये असलेल्या शिक्षणात याचा काही फायदा होत नसून, याउलट राज्य शासनाच्या अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेत सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अडचणीत येत असल्याचेही दिसून आले.ज्या सीबीएससी पॅटर्नचा उपयोग राज्य शासनाच्या नियमात नसेल तर ते या खाजगी शिक्षण संस्थेत का शिकवल्या जातात? व सीबीएससी पॅटर्न पुस्तके प्रकाशित करणाऱ्या कंपनीची तर काही धागे जुळली नाही ना? असाही सवाल मनसे पदाधिकारी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना केला.येत्या काही दिवसात जर या खाजगी शिक्षण संस्थेतील सीबीएससी पॅटर्न शिक्षण बंद झाले नाही.तर मनसे पदाधिकारी आमरण उपोषण करण्याची तयारी करणार असे सांगितले.
--------------------------------------
गट शिक्षण अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या अहवालानुसार मान्यता रद्द न झाल्यास तसेच कायदेशीर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार तसेच लवकरच मनसेचे एक शिष्ट मंडळ, राजसाहेब ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटण्याकरिता सविस्तर अहवाल घेऊन मुंबईला रवाना होणार आहे.असे वृत्त मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर कारंजा (वाशिम)यांनी कळवीले आहे.