ग्राम रुई गोस्ता ता. मानोरा जि.अमरावती हे दरदिवशी आपल्या ग्रुपवरून व भ्रमणध्वनी वरील संवादातून शेतकऱ्यांशी हवामान अंदाजाविषयी हितगुज करीत असतात.ते कारंजा येथील करंजमहात्म्य परिवारातील सदस्य असून,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी त्यांची नेहमीच चर्चा होत असते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चर्चेतून, "परतीचा पाऊस समाधानकारक होऊन,पूर्व विदर्भात जास्त प्रमाणात तर पश्चिम विदर्भात काही भागात कमीजास्त प्रमाणात बरसणार असून,ढगांच्या प्रचंड गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह बरसणार असल्याविषयीचे,तसेच काही भागात विजा पडणार असल्याचे भाकित केलेले होते. " त्यांच्या अंदाजाप्रमाणे आज भर दुपारी मराठवाड्यातील नांदेड सह वाशिम, अकोला,अमरावती, यवतमाळ,बुलडाणा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस कोसळला असल्याचे वृत्त अनेक भागामधून,आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळविले आहे.सध्या अकोला, अमरावती जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील वाशिम,रिसोड, मालेगाव,मंगरूळपीर,मानोरा, कारंजा तालुक्यात पाऊस सुरुच असून,रात्री रात्रभर दमदार पाऊस होण्याचा सुद्धा अंदाज आहे.त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या अंदाजानुसार मराठवाडा,विदर्भात येत्या दोन-तीन दिवस काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून,विजा पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून, शेतकरी-ग्रामस्थांनी दुपारी शेतात थांबू नये. मुख्यतः पाऊस सुरु असतांना झाडाखाली आसरा घेऊच नये.आपली गुरे ढोरे झाडा खाली बांधू नये.नदी नाल्याला किंवा पांदण रस्त्याला आलेल्या पुरामधून आपली वाहने मुख्य म्हणजे बैलगाडी,सायकल,मोटर सायकली पुराचे पाण्यातून काढू नये.विद्युत खांबाला स्पर्श करू नये.असे जनहितार्थ विनम्र आवाहन करंजमहात्म्य परिवार आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.