आपल्या व समाजाच्या पालनपोषणासाठी शेतकरी राजा आपल्या शेतात रात्रंदिवस कष्ट करीत असतो.परंतु सद्यस्थितीत अस्मानी व सुलतानी संकटांसोबतच वन्यप्राण्याच्या वाढीव संख्येमुळे परिसरात रोही, निलगायी,रानडुक्कर,हरिण काळवीट इत्यादी वन्यपशूमुळे त्याच्या शेतातील पिकाची नासाडी होत असल्या कारणाने पाऊस असो वा थंडी किंवा उकाडा पण त्याही परिस्थितीत शेतकऱ्याला रखवाली करीता रात्र रात्रभर जागलीला जावे लागते.परंतु त्यांच्यावर कित्येकदा वन्य प्राण्यांकडून असे हल्ले होत असतात व त्यामध्ये निष्पाप कष्टकरी शेतकऱ्यांना स्वतःच्या जीवाला मुकावे लागते. त्यामुळे सरकारने वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मय्यत शेतकरी राजू आत्माराम लळे यांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी काकडशिवनी येथील सरपंच प्रकाश लिंगाटे यांनी लावून धरली आहे.