पुणे दि. पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार क्रांती प्रदण असून हा विचारच सामाजिक न्याय परिवर्तनाला चालना देवु शकतात असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी परिवर्तनवादी आणि थोर समाज सुधारक क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या पावस्मृतीला अभिवादन करण्यासाठी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले वाडा (राष्ट्रीय स्मारक समता भूमी )येथे बहुजन जनता दल पुणे जिल्हा शाखेच्या वतीने दि.२८ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे बोलत होते
सामाजिक न्याय व सामाजिक समता या मुद्द्यावरून भांडता दलित बहुजनांच्या आर्थिक विकासासाठी भांडणे आता जास्त आवश्यक झाल्याचेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले असून दलित बहुजनांच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करणारे सर्वच महामंडळातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणे आता जास्त गरजेचे झाले आहे असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे कार्यक्रमाचे संचालन सुभाष सुरवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बळीराम कांबळे यांनी केले यावेळी जोखान सय्यद बंडू जाधव शिवाजी कोकाटे राज माने किशोर चौधरी शांताराम गावंडे हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर दिपक कांबळे विशाल माने किशोर राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज पाटील यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते