अकोला:-
१९०९ यावर्षी स्थापन झालेल्या व तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुने शहर अकोला येथील श्री राठोड पंच बंगला रजिस्टर नंबर २३१ए या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाशदादा डवले यांची अविरोध निवड नुकतीच करण्यात आली .
अकोल्यातील प्राचीन संस्कृतीचा वारसा असणाऱ्या श्री राठोड पंच बंगला या संस्थेची आमसभा अक्षय तृतीयेच्या दिवशी संपन्न झाली या सभेमध्ये उपस्थित राठोड तेली समाजाने सर्वानुमते शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे संचालक , अर्थतज्ञ , समाजसेवी प्रकाशदादा डवले यांची अविरोध निवड केली . यावेळी समाजाच्या वतीने निवडणूक अधिकारी रमेश गोतमारे हे होते. मंचावर माजी अध्यक्ष दिलीप नायसे , संजय वानखडे , उमेश सापधारे , प्रशांत चोपडे , दिलीप भगत उपस्थित होते .
नवीन कार्यकारिणीची नेमणूक अध्यक्ष प्रकाशदादा डवले यांनी केली त्यामध्ये अध्यक्ष - प्रकाशदादा डवले , उपाध्यक्ष - गजानन बोराडे , मनोज वानखडे , राजेंद्र गोतमारे , सचिव - मंगेश वानखडे , सहसचिव - ललित भगत , कोषाध्यक्ष - प्रशांत शेवतकर , सहकोषाध्यक्ष - निलेश कपले , प्रसिद्धी प्रमुख - यश डेरे , कायदेशीर सल्लागार - ॲड भूषण भागवत , ॲड वैष्णवी काठोके , सदस्य - गोपाल राऊत , राजेश पातळे , मदन भिरड , प्रवीण झापर्डे , देवेंद्र भिरड , केशव साकरकार , विजय वानखडे , वैभव मेहरे , विशाल गमे , प्रमोद चोपडे , नवीन अकोटकर , वैभव नवथळे , पवन मेहसरे यांची निवड करण्यात आली .
सल्लागार मंडळामध्ये समाजातील मार्गदर्शक - सुधाकरराव झापर्डे , बालमुकुंद भिरड , विष्णुपंत मेहेरे , वामनराव चोपडे , रमेश गोतमारे , गोपाळराव भिरड , प्रकाश फाटे , माणिकराव नालट , दिपक इचे , रामेश्वर वानखडे , संजय वानखडे , दिलीप नायसे यांचा समावेश आहे .
आमसभेच्या कार्यक्रमास शेषराव सांगे , प्रकाश झापर्डे , चोपडे , अनिल वानखडे , राजेश वानखडे , रवी वानखडे , गमे व इतर समाज बांधव उपस्थित होते . उपरोक्त निवडीबद्दल समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....