सोमा डोमा आंध यांचा जन्म ९ मार्च १८९७ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरडा येथे झाला होता.इंग्रजांविरुद्ध सन १९३० ते १९४३ पर्यंत उठाव केला होता, सोमा डोमा आंध हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एक अग्रगण्य स्वातंत्रवीर होते, यवतमाळ नगर परिषदेच्या कार्यालयात जिल्ह्यातील क्रांतीविराची जी सूची आहे आहे त्यामध्ये सोमा डोमा आंध यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.सोमा डोमा आंध हे आंध जमातीचे एक प्रमुख क्रांतिकारक असले तरी ते सर्व समाजाचे होते.त्यांचे आडनाव उमरे असे होते.यवतमाळ ते पुसद या मार्गावर ५ किलोमीटर अंतरावर घाटाचा रस्ता आहे .या रस्त्यावर चंदन आणि सागाच्या वृक्षाचे घनदाट जंगल आहे. याच जंगलात उमरडा (UMRDA) हे एक छोटेसे आदिवासी गाव आहे. याचं गावचे स्वातंत्रवीर सोमा डोमा आंध (उमरे) हे आहेत.
सोमा डोमा आंध हे लहानपणापासूनच तल्लखं बुद्धीचे व करारीवृत्तीचे असल्याने कोणीही केलेला अन्याय्य ,अत्याचार त्यांना सहन होत नसे.म्हणून त्यांनी कशाचीही पर्वा न करता स्वतः एकट्यानेच या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. सावकार,जमीनदार ,पाटील यांनी भोळ्या आदिवासींना लुबाडून त्यांच्या शेकडो एकर जमीनि बळकावल्या या विरुद्ध पहिला लढा देणारे कोण असेल तर ते म्हणजे सोमा डोमा आंध.त्यांनी मोठ्या प्रमाणावर आदिवासींवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आदिवासीमध्ये जनजागृती केली. तेथील कोलाम,आंध,प्रधान,गोंड अशा अनेक जमातींना पटवून सांगितले की हे लोक आपल्यावर कशा प्रकारचे अन्याय्य अत्याचार करतात.आता पण तेथील गावातील म्हातारे लोक सांगतात की जेव्हा सोमा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी सभेत बोलत असे तेव्हा गावातील व आजूबाजूचे सर्व बाया, मुले ,माणसे,लेकरं सर्व काम सोडून सोमा काय सांगतो ? हे ऐकायला येत असत. तेव्हा सोमाचा एक एक शब्द म्हणजे बाणांचा तिर होता,त्यांच्या बोलण्यातून समोरच्या लोकात विरश्री संचारत असे,ते अजिबात कोणालाही घाबरत नसत,अतिशय निडर वृत्तीचा सोमा होता,म्हणून त्याचे वाट्याला एकटा दुकटा इंग्रच कधीच आड येत नसे.
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील ग्राम धुंदी येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व सोमा डोमा आंध यांनी केले.पण दुर्दैवाने त्याची दखल ना आंध जमातीने,दुसऱ्या कोणत्या जमातीने घेतली नाही,ना शासनाने घेतली.
देशाच्या स्वातंत्रप्राप्तीसाठी मतृभूमीचे स्वातंत्र्य हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून व त्या ध्येयाने प्रेरीत होऊन विदर्भात कोठेही आंदोलन चालू झाले की सोमा वाऱ्यासारखा तिकडे भिरकायचा.त्यांनी आपल्या भाल्याचा शस्त्रासारखा वापर करून अनेक इंग्रजांना टिपले होते.
जेव्हा महात्मा गांधी सेवाग्राम वर्धा येथे आले आहे असे सोमा डोमा आंधला समजले तेव्हा ते पायी जात महात्मा गांधीजींना जाऊन भेटले व यवतमाळ जिल्ह्यातील स्वातंत्र चळवळी बद्दल त्यांनी गांधीसोबत चर्चा केली होती आणि पुढील दिशा ठरवली होती .त्यानंतर बऱ्याच चळवळी सोमा डोमा आंधने गाजवल्या ते आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहिले शेवटी ते १० डिसेंम्बर १९४३ रोजी शहीद झाले.
अशा या महान क्रांतीवीराने आपले आयुष्य समाजासाठी व देशाच्या चळवळी मध्ये झोकून दिले होते.
सोमा डोमा आंध यांच्या ९ मार्च जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस साप्ताहिक करंजमहात्म्य परिवारातर्फे संजय कडोळे यांनी विनम्र अभिवादन केले आहे . !
आपल्या प्रतिक्रिया द्या....