कारंजा (करंजमहात्म्य वृत्तसेवा) : वैदर्भीय नाथ समाज संघ संलग्नित वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट या समाजसेवी संस्थेच्या वतीने कारंजा (लाड) येथील महेश भवन येथे दि. 23 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामधून एकूण 85 समाजसेवी सेवाव्रती व्यक्तींची राज्यस्तरिय पुरस्कारा करीता निवड करण्यात आली असून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,मानाचा दुपट्टा व फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर भव्य अशा सोहळ्याच्या अध्यक्षा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके तसेच उद्घाटक म्हणून राज्याचे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण राज्यमंत्री ना. इंद्रनीलजी नाईक हे असून प्रमुख अतिथी मध्ये विधान परिषदेच्या आमदार श्रीमती भावनाताई गवळी, आमदार हरीशजी पिंपळे, आमदार श्यामभाऊ खोडे, अमरावती विधान परिषद मतदार संघाचे शिक्षक आमदार किरणरावजी सरनाईक, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोलजी पाटणकर, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्रजी शुक्ला तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आदर्श समाजसेवक विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी कडोळे हे असणार आहेत तर सदर सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून गिरधारीलालजी सारडा तथा सह स्वागताध्यक्ष म्हणून निलेशजी सोमानी हे राहणार आहेत. असतील. हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा हा निमंत्रितांकरिता असून संबंधितांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थिती द्यावी,असे आवाहन वैदर्भियनाथ चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.पुनम एकनाथ पवार तसेच सचिव श्री एकनाथ पवार यांनी केले आहे. असे कळविण्यात आले आहे.