महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.प.वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे डॉ. लालशिंग खालसा प्राचार्य यांच्या मार्गदर्शनातून वाणिज्य विभाग व CMH कॉम्पुटर इन्स्टिट्यूट आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने सनदी लेखापाल या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
एकदिवशीय कार्यशाळेत मोहन बाळबुद्धे यांनी विद्यार्थ्याना CA या अभ्यासक्रमबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना आलेल्या प्रश्नचे उत्तरासह समाधान केले. आणि विद्यार्थ्याना कानमंत्र देतांना सांगितले कि इच्छा व कष्ट उपसायची सवय लावली कि यश मिळतो असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोज ठवरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले कि योग्य मार्गदर्शन मिळाला कि व्यक्ती यशाचे शिखर गाठतो असा मंत्र दिला आणि या प्रकारची विद्यार्थ्याना मार्गदर्शन मिळावा यासाठी एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करीत असतात आणि सदैव करीत राहू या प्रकारचा आस्वाशन दिला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. मनोज ठवरे वाणिज्य विभाग प्रमुख, प्रमुख मार्गदर्शक मोहन बाळबुद्धे, प्रमुख पाहुणे मुकुल खेवले संचालक तथा TALLY प्रशिक्षक CMH कॉम्पुटर इन्स्टिटयूट आरमोरी, प्रा. कु. सायली जांभुळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.रूमदेव सहारे हितकारिणी कनिष्ठ विद्यालय आरमोरी व प्रा.गायधणे महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी यांनी आभार व्यक्त केले